मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

जालन्याच्या डॉक्टरची कमाल! सोलर कुकरवर कुकीज करायला शिकवून अनेक महिलांना दिला रोजगार; आहे 30 लाखांची उलाढाल

जालन्याच्या डॉक्टरची कमाल! सोलर कुकरवर कुकीज करायला शिकवून अनेक महिलांना दिला रोजगार; आहे 30 लाखांची उलाढाल

स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून एक स्टार्टअप (Startup In Jalna) उद्योग सुरू केला आणि अनेक गरीब महिलांना रोजगारसंधी उपलब्ध करून दिली. जालन्याच्या या डेन्टिस्ट महिलेची प्रेरणादायी गोष्ट..

स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून एक स्टार्टअप (Startup In Jalna) उद्योग सुरू केला आणि अनेक गरीब महिलांना रोजगारसंधी उपलब्ध करून दिली. जालन्याच्या या डेन्टिस्ट महिलेची प्रेरणादायी गोष्ट..

स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून एक स्टार्टअप (Startup In Jalna) उद्योग सुरू केला आणि अनेक गरीब महिलांना रोजगारसंधी उपलब्ध करून दिली. जालन्याच्या या डेन्टिस्ट महिलेची प्रेरणादायी गोष्ट..

जालना, 15 ऑगस्ट: जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांच्या जोरावर एखादी महिला यशस्वी उद्योजक (women Entrepreneur) झाल्याचं आपण पाहतो. अशा महिलांचं काम समाजासाठी आणि उद्योगात (small Business) भरारी घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी प्रेरणादायी असतं. ही गोष्ट अशाच एका महिलेची आहे, की ज्या महिलेनं स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून एक स्टार्टअप (Startup In Jalna) उद्योग सुरू केला आणि त्या माध्यमातून अनेक गरीब, आदिवासी महिलांना रोजगारसंधी उपलब्ध करून दिली. जालन्याच्या या डेन्टिस्ट महिलेचा डॉक्टर ते रोजगार निर्मिती करणारी यशस्वी उद्योजिका असा प्रवास प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्रातल्या जालना (Jalna) इथल्या डॉ. मीनल काबरा (Dr. Meenal Kabra) दंतशल्यचिकित्सक आहेत. गेल्या 10 वर्षांपासून त्या जालन्यात डेन्टिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. 33 वर्षीय मीनल यांनी 2009 मध्ये नागपूरमधून बीडीएस (BDS) ही पदवी घेतली. त्यानंतर त्या 2 वर्षं अमरावती येथे प्रॅक्टिस करत होत्या. लग्नानंतर त्या जालना येथे स्थायिक झाल्या आहेत. त्यांच्या या क्लिनिकमध्ये अनेक गोरगरीब, गरजू महिला येत असत. त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसायची. या महिला मीनल यांना 'काही काम मिळेल का' असं वारंवार विचारत असत. या महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी काही तरी करण्याचं त्यांच्या मनात सुरू होतं.

बिझनेस सुरू करायचाय? पोहे करतील काम; 25 हजार गुंतवलेत तरी दीड लाख कमाई

'दैनिक भास्कर'ने डॉ. मीनल यांच्याबद्दल सविस्तर वृत्त दिलं आहे. 'आमच्या इथे सणासुदीनिमित्त नातेवाईकांना मिठाई आणि कुकीज (Cookies) पाठवण्याची पद्धत आहे. मी स्वतः सणासुदीला नातेवाईकांना मिठाई, कुकीज पाठवत असते. आरोग्यपूर्ण आहार या संकल्पनेतून ही मिठाई, कुकीज मी सौरऊर्जेचा (Solar Energy) वापर करून तयार करते. एके दिवशी नवऱ्याशी चर्चा करताना याला व्यावसायिक स्वरूप देण्याचा विचार पुढे आला आणि व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली,' असं मीनल यांनी सांगितलं.

8वी ते 12वी पर्यंतच शिकलेल्यांसाठी सरकारच्या खास योजना, दूर करता येईल बेरोजगारी

डॉ. मीनल घरात तयार होणार सौरऊर्जेवर कुकीज, चॉकलेट आणि हेल्दी स्नॅक्स (Healthy Snacks) तयार करून त्याचं देशभरात मार्केटिंग करत आहेत. या स्टार्टअपशी 30 हून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. यंदा डॉ. मीनल यांच्या या कंपनीची उलाढाल 30 लाख रुपये झाली आहे. सध्या डॉ. मीनल आणि त्यांची टीम 30 किलोपेक्षा अधिक कुकीज तयार करतात. त्यांच्याकडे कुकीजचे 6 प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय त्या विविध प्रकारची आरोग्यदायी चॉकलेट्स आणि स्नॅक्सही तयार करतात. कुकीज आणि अन्य उत्पादनं तयार करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जात असल्याने आम्ही प्रतिकिलो 500 ग्राम कार्बन डाय ऑक्साइड वातावरणात जाण्यापासून रोखत आहोत, असं डॉ. मीनल आवर्जून सांगतात.

डॉ. मीनल यांची ही वाटचाल फारशी सोपी नव्हती. हा स्टार्टअप सुरू करण्याबाबत विचार पक्का झाल्यावर 2019 च्या अखेरीस त्यांनी याबाबत काही स्थानिक महिलांशी (Local Women) संवाद साधला आणि त्यांना सोबत घेतलं. त्यानंतर स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून कच्चा माल खरेदी केला आणि घरीच सौर ऊर्जेच्या वापरातून कुकीजची निर्मिती सुरू केली. त्यानंतर प्रश्न होता मार्केटिंगचा. हा प्रश्न डॉ. मीनल यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सोडवून स्वतःच मार्केटिंग सुरू केलं. जालना आणि नजीकच्या जिल्ह्यांमधल्या दुकानांत उत्पादनांचा पुरवठा सुरू केला. आमची ही आयडिया युनिक होती. सौर ऊर्जेच्या वापरातून कुकीजचं उत्पादन हेच आमच्या स्टार्ट-अपचे वैशिष्ट्य ठरल्याचं डॉ. मीनल सांगतात.

सिनेमालाही लाजवेल अशी या पतीपत्नीची कहाणी; एकत्र केला IPS होण्याचा प्रवास

'काही महिन्यांनंतर उत्पादनांना मागणी वाढल्याने घरीच सोलर कुकरच्या मदतीने कुकीज करणं अवघड जाऊ लागलं. त्यामुळे स्थानिक महिलांना असे कुकर देऊन त्यांच्या घरीच त्यांना कुकीजची निर्मिती कशी करता येईल यावर विचार सुरू केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. मी माझ्याकडील महिलांना कुकर खरेदी करुन दिले. माझा हा निर्णय योग्य ठरला. त्यानंतर आम्ही रिटेल नेटवर्क तयार करणं सुरू केलं. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, चेन्नई आदी ठिकाणी आमचं उत्पादन जाऊ लागलं. देशातल्या 17 शहरांमध्ये आमची 70 स्टोअर्स झाली आहेत. तसंच आम्ही अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टवरूनही (Flipcart) विक्री सुरू केली आहे,' असं डॉ. मीनल यांनी सांगितलं. गरजू, गरीब महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी या फ्रॅंचाईजी मॉडेलच्या आधारे देशाच्या विविध भागांत प्रोजेक्ट सुरू करण्याचं डॉ. मीनल यांचे आगामी नियोजन आहे.

Amul सह 2 लाखात सुरू करा तुमचा बिजनेस, महिन्याला होईल मोठी कमाई

सध्या कुकीज आणि स्नॅक्सचा आहारात समावेश झाल्याने यास चांगली मागणी आहे. हे पदार्थ तयार करण्यासाठी उत्पादनखर्च कमी येतो. कोणीही असा व्यवसाय सुरू करू शकतं. यासाठी सर्वप्रथम असे पदार्थ तयार करण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. कच्च्या मालासाठी स्थानिक शेतकऱ्यांशी करार करावा लागतो, कंपनी रजिस्ट्रेशनसाठी प्रोफेशनल सीएची मदत घ्यावी लागते. मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून व्यवसायात यशस्वी होता येतं, असं त्या सांगतात.

First published:

Tags: Inspiration, Nari Shakti, Startup, Startup Success Story, Success story, Woman Entrepreneur, Women