नवी दिल्ली, 23 जुलै: तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असलात, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रोजच्या नाश्त्यामधला नेहमीचा एक पदार्थ तुम्हाला अगदी कमी गुंतवणुकीच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देऊ शकतो. हा पदार्थ म्हणजे पोहे. देशभरात मोठ्या प्रमाणात पोहे खाल्ले जातात. त्यामुळे कच्चे पोहे बनवण्याचा व्यवसाय
(Poha Making business) तुम्हाला चांगलाच नफा मिळवून देऊ शकतो. कशा प्रकारे तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता, हे पाहू या.
स्वतःची गुंतवणूक अगदी कमी; 90 टक्क्यांपर्यंत मिळतं कर्ज
खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत
(Khadi Village Industries Commission) (केव्हीआयसी) तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्ट प्रोफाइलनुसार पोहे बनवण्याचा प्रकल्प किंवा पोह्याची गिरणी उभारण्यासाठी सुमारे 2.43 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो; पण हा सर्व खर्च तुम्हाला करण्याची गरज नाही. सरकार तुम्हाला या प्रकल्पासाठी 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देतं (Small business Loan). त्यामुळे तुम्हाला तुमच्या खिशातून केवळ 25 हजार रुपये खर्च करावे लागतील.
केव्हीआयसीच्या (
KVIC) रिपोर्टनुसार सुमारे अडीच लाख रुपयांमध्येच तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी जास्त जागेचीही गरज नाही. केवळ 500 स्क्वेअर फूट जागेमध्ये हे युनिट बसवता येतं. या युनिटसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. पोहे बनवण्याचं मशीन, सीव्स, भट्टी, पॅकिंग मशीन, ड्रम अशा गोष्टींसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. याव्यतिरिक्त सुमारे 43 ते 50 हजार रुपयांचं खेळतं भांडवल लागतं.
देशात येणार स्वतःची Digital Currency; RBI चा मोठा खुलासा
केव्हीआयसी रिपोर्टमधील माहितीनुसार, कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून, ग्रामोद्योग रोजगार योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे. केव्हीआयसी दर वर्षी ग्रामोद्योगांना (Village Industry) चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज देतं. या योजनेमधूनच तुम्हालाही 90 टक्क्यांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं.
किती होईल कमाई?
या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला कच्चा माल खरेदी करावा लागेल. यासाठी सुमारे 6.50 लाख रुपये खर्च करावे लागतील.
कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये, तुमच्या पत्नीलाही मिळेल अतिरिक्त लाभ?
या सर्व सामानाचा वापर करून तुम्ही सुमारे एक हजार क्विंटल पोहे तयार करू शकाल. याचा एकूण निर्मितीखर्च म्हणजे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन आता 8.60 लाख रुपये झालं. (प्रकल्प आणि कच्चा माल दोन्ही मिळून). हे एक हजार क्विंटल पोहे विकल्यास सुमारे 10 लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं. म्हणजेच, यातून तुम्हाला सुमारे 1.40 लाख रुपये नफा होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.