Home /News /career /

सिनेमालाही लाजवेल अशी या पतीपत्नीची कहाणी; एकत्र केला IPS होण्याचा प्रवास

सिनेमालाही लाजवेल अशी या पतीपत्नीची कहाणी; एकत्र केला IPS होण्याचा प्रवास

आयपीएस ऑफिसर अंकुर अग्रवाल (IPS Officer Ankur Agarwal) आणि त्यांची पत्नी वृंदा शुक्ला (IPS Vrinda Shukla) यांची कहाणी अगदी फिल्मी आहे. लहानपणापासून दोघांमध्ये मैत्री होती.

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : नवरा कमावता असला तरी बायकोच घरामध्ये बॉस असते असं सगळेजण म्हणतात. पण, उत्तर प्रदेशमध्ये नोयडामध्ये (Noida,Uttar Pradesh) राहणाऱ्या आयपीएस ऑफिसर अंकुर अग्रवाल (IPS Officer Ankur Agarwal) यांची पत्नी आयपीएस वृंदा शुक्ला (IPS Vrinda Shukla)खरोखरच ऑफिसमध्ये त्यांची बॉस आहे. लहानपणापासुनच दोघंची मैत्री होती त्यानंतर, त्यांनी एकत्र शिक्षण घेतलं. मग दोघेही आयपीएस ऑफिसर (IPS Officer) झाले आणि 2019 मध्ये त्यांनी लग्न केलं.उत्तर प्रदेशात गौतम बुद्ध नगर (Gautam Buddha Nagar,Uttar Pradesh) जिल्ह्यामध्ये वृंदा शुक्ला या पोलीस उपायुक्त(DCP)म्हणून काम करत आहेत. त्या डीसीपी महिला सुरक्षा पदावर कार्यरत आहेत तर, अंकुर अग्रवाल अप्पर पोलीस आयुक्त (Upper Commissioner of Police) आहेत. अंकुर अग्रवाल आणि वृंदा शुक्ला हरियाणाच्या अंबालामधले (Ambala, Haryana) राहणारे आहेत. दोघेही शेजारी होते. त्यांनी अंबाला मधल्या कॉन्व्हेन्ट जीजस अ‍ॅन्ड स्कूलमध्ये दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी वृंदा शुक्ला अमेरिकेला (America) गेल्या तर, अंकुर यांनी भारतामध्ये राहून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. (ऑनलाईन अभ्यासामुळे डोळे होतील खराब; अशी घ्या मुलांची काळजी) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वृंदा यांनी अमेरिकेमध्ये नोकरी करायला सुरुवात केली तर, अंकुर अग्रवाल यांना बेंगलुरु मध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर ते सुद्धा अमेरिकेला गेले आणि दोघांची पुन्हा भेट झाली. (सकाळी अंथरुणामधून उठतांना येत असेल चक्कर तर, घातक आजाराचे आहेत संकेत) अमेरिकेमध्ये नोकरी करत असताना अंकुर अग्रवाल आणि वृंदा शुक्ला यांनी यूपीएससी परीक्षेची (UPSC Exam) तयारी सुरू केली. त्यानंतर 2014 मध्ये वृंदा शुक्ला यांनी दुसऱ्या प्रयत्नामध्ये सिविल सर्विसेसची परीक्षा पास केली आणि IPS ऑफिसर झाल्या. त्यांना नागालॅन्ड कॅडर देण्यात आलं. तर, त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 2016 मध्ये अंकुर यांनी पहिल्याच प्रयत्नांमध्ये सिविल सर्विस परीक्षा पास करत. IPS ऑफिसर होत बिहार कॅडर मिळवलं. (भूक लागली म्हणून कधीही काहीही खाणं पडेल महागात; 'हे' 8 पदार्थ विशिष्ट वेळेलाच खा) लहानपणापासूनच मित्र असलेल्या वृंदा शुक्ला आणि अंकुर अग्रवाल यांनी IPS झाल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला आणि 2019 मध्ये लग्नगाठ बांधली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Inspiring story, IPS Officer, Love story, Success stories, Upsc exam

    पुढील बातम्या