मराठी बातम्या /बातम्या /करिअर /मोठी बातमी! UPSC 2021 परीक्षेचा निकाल अखेर जाहीर; श्रुती शर्माने मारली बाजी

मोठी बातमी! UPSC 2021 परीक्षेचा निकाल अखेर जाहीर; श्रुती शर्माने मारली बाजी

UPSC टॉपर श्रुती शर्मा

UPSC टॉपर श्रुती शर्मा

UPSC 2021 परीक्षेचा निकाल अखेर जाहीर; देशातून श्रुती शर्माने मारली बाजी

मुंबई, 30 मे: UPSC CSE प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली आणि परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षा (UPSC Mains Exam 2022) 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आला. 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि 26 मे रोजी संपलेल्या परीक्षेची मुलाखत (UPSC Interview 2022) ही शेवटची फेरी होती. त्यानुसार आता UPSC 2021 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

UPSC तर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये श्रुती शर्माने ऑल इंडिया रँक 1 आला आहे. Indian Administrative Service; Indian Foreign Service, Indian Police Service and Central Services, Group ‘A’ and Group ‘B’ या विभागांसाठी उमेदवारांची निवड केली आहे. प्रिलिम्स, मेन्स आणि त्यानंतर मुलाखतीच्या सर्व परीक्षा पास जरून UPSC तर्फे देशातून 685 उमेदवारांना अपॉईंट करण्यात येणार आहे.

प्राध्यापकांनो, त्वरा करा, 'या' जिल्ह्यातील AIIMS मध्ये 34 जागा रिक्त; करा अर्ज

यामध्ये 244 उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत तर 73 उमेदवार हे EWS प्रवर्गातील आहेत. 203 उमेदवार हे OBC प्रवर्गातील आहेत तर 105 उमेदवार हे SC प्रवर्गातील आहेत. ST प्रवर्गातील 60 उमेदवार आहेत असे एकूण 685 उमेदवार हे सिव्हिल सर्व्हिसेससाठी अपॉईंट करण्यात येणार आहेत. तसंच UPSC तर्फे 63 उमेदवारांना रिझर्व्ह विभागात ठेवण्यात आलं आहे.

आज जाहीर झालेल्या अंतिम निकालात श्रुती शर्माने ऑल इंडिया रँक 1 मिळवला आहे. या वर्षी सर्व टॉप तीन पोझिशन्स मुली उमेदवारांनी मिळवल्या आहेत. श्रुती सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे आणि ती जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादमीमध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे.

महत्त्वाची बातमी! संगीत क्षेत्रातील पदवीधरांसाठी मुंबई विद्यापीठात भरती

असा चेक करा निकाल

अधिकृत वेबसाइटला भेट द्या — upsc.gov.in

मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या ‘UPSC नागरी सेवा अंतिम निकाल 2021’ या लिंकवर क्लिक करा.

यानंतर स्क्रीनवर PDF फाइलमध्ये दिसेल

डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

First published:

Tags: Entrance exam, Exam Fever 2022, Exam result, Ias officer, Upsc, Upsc exam