पॉप स्टार कार्डी बी Only Fans प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. तसंच या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक कमाई करणारीही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्डी बी या प्लॅटफॉर्मवर महिन्याला 8 मिलियन डॉलर्सची कमाई करते. तिने याबाबत बोलताना सांगितलं, की ती केवळ आपल्या चाहत्यांशी जोडण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर असून कोणतीही अडल्ट किंवा प्रायव्हेट सामग्री शेअर केली जात नाही. या प्लॅटफॉर्मवर ती कमी अॅक्टिव्ह असूनही सर्वाधिक कमाई करत आहे.