मराठी बातम्या /बातम्या /करिअर /कर्तृत्वाने मिळवली ‘मिरॅकल मॅन’ उपाधी; IAS आर्मस्ट्रॉंग पेम कसे ठरले Youth Icon

कर्तृत्वाने मिळवली ‘मिरॅकल मॅन’ उपाधी; IAS आर्मस्ट्रॉंग पेम कसे ठरले Youth Icon


युथ आयकॉन IAS आर्मस्ट्रॉंग पेम; कर्तृत्वाने मिळवली ‘मिरॅकल मॅन’ उपाधी

युथ आयकॉन IAS आर्मस्ट्रॉंग पेम; कर्तृत्वाने मिळवली ‘मिरॅकल मॅन’ उपाधी

देशाच्या दुर्गम भागात शिकून वयाच्या चोविसाव्या वर्षी ते IAS झाले. 2015 मध्ये त्यांना बेस्ट IAS ऑफिसर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. UPSC परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी आदर्श असलेले आर्मस्ट्रॉंग पेम यांच्याबद्दल..

नवी दिल्ली, 08 जुलै:  देशातल्या UPSC परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी आदर्श असलेले आर्मस्ट्रॉंग पेम (IAS Armstrong Pame) हे मणिपूरचे  (Manipur)आहेत. IAS आर्मस्ट्रॉंग पेम यांनी मणिपूरच्या युनायटेड बिल्डर्स स्कूलमध्ये दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर शिलॉंग मधील(Shillong) सेंट एडमंटन कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीच्या प्रतिष्ठित सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये (St. Stephen's College)फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

IAS आर्मस्ट्रॉंग पेम यांनी 2007 मध्ये सिविल सेवा परीक्षा (Civil Service Examination) दिली आणि सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन विभागामध्ये IRS मध्ये त्यांची निवड झाली. त्यानंतर 2008 मध्ये UPSC परीक्षा (UPSC Exam) देत IAS झाले. अवघ्या 24 वर्षी त्यांनी IAS बनण्याचा मान मिळवला.

आर्मस्ट्रॉंग पेम हे देशभरात ‘मिरॅकल मॅन’(Miracle Man)म्हणून ओळखले जातात. आर्मस्ट्रॉंग पेम हे नागालँडच्या जेनेसमुदायाचे आहेत. या समुदायामधून IAS अधिकारी बनणारे ते पहिले व्यक्ती आहेत.

(SBI ची नवी हॉलिडे स्कीम; RD प्रमाणे पैसे जमवा, फिरायला जा आणि वर व्याजही घ्या)

मणिपूरला नागालँड आणि आसाम बरोबर जोडणाऱ्या जोडणार्‍या पीपल्स रोडमुळे (People's Road) प्रसिद्धी मिळाली  शंभर किलोमीटर लांबीचा अशक्य वाटणाऱ्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. त्या प्रोजेक्टमुळे त्यांना ‘मिरॅकल मॅन’ नावाने देशात ओळख मिळाली. IAS आर्मस्ट्रॉंग पेम मणिपूरच्या तोमगलोंग जिल्ह्याच्या तौसेम सब डिव्हिजनचे इम्पा गाव मधले आहेत. ते ‘जेमे’ भाषा समुदायाचे आहेत.

(कोरोना काळात वाढाला ताण; विद्यार्थांसाठी स्ट्रेस कमी करणारे उपाय)

त्यांचे वडील हैतुंग पेम आणि आई निगवांगल तिथेच राहतात. त्यांचे मोठे भाऊ जेरेमीया पेम दिल्लीच्या विश्व विद्यालयांमध्ये इंग्रजी विभागात लेक्चर आहेत.IAS आर्मस्ट्रॉंग पेम पब्लिक सर्विस कॅटेगरीमध्ये CNN_IBN ‘इंडिया ऑफ द इयर’ साठी नॉमिनेट झाले होते. 2015 मध्ये त्यांना बेस्ट IAS ऑफिसर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Inspiration, Inspiring story, Success stories, Success story