दिल्ली,06 जुलै: फॅशनेबल राहम्याने लोकांचा आत्मविश्वास उंचावतो (Benefits Of Being Fashionable). कपड्यांपासून ते हेअरस्टाईलपर्यंत बरेच लोक नवीन फॅशन फॉलो करतात. कराण बऱ्याचजमांना असं वाटतं की फॅशन फॉलो केली नाही तर, ऑऊट ऑफ प्लेस वाटतील. पण कधीकधी फॅशनच्या नावाखाली जगात विचित्र गोष्टी ट्रेंड होऊ लागतात (Weird Fashion Trend). आजकाल पुरुषांमध्ये गोल दाढी (New 'circle beard' trend) ठेवण्याची फॅशन सुरू आहे. काही अशी दाढी करून त्याचे फोटो शेअर केलेत. त्यांना पाहून तुम्हीही हसत असाल.
आजकाल सोशल मीडियावर पुरुषांची ही फॅशन ट्रेंड होत आहे. मुलं लांब आणि लहान दाढी करत आहेत. लॉकडाउन आल्यापासून रिकामा वेळ मिळाल्याने काहींना नवीन स्टाईल ट्रेन्ड करायला वेळ मिळाला आहे. आजकाल पुरुष गोल दाढी वाढवत आहेत. पण, ते पाहून टॉयलेट सीटची आठवण येत आहे. खुपच कमी जणांनी अशी दाढी ठेवली आहे. अण, ट्रेंडिंग सुरू झाल्याने बरेच लोक फॉलो करतायेत.
(जगातली सर्वांत वृद्ध हत्तीण आजारी;100 पार केलेली वत्सला कुठे आहे, काय झालंय तिला)
लॉकडाऊन एक्सपिरिमेन्ट
लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या लोकांनी गोल दाढीची फॅशन काढल्याचं बोललं जात आहे. गोल दाढी ठेवून अनेक पुरुषांनी आपले फोटो इंटरनेटवर शेअर केलेत. काहींना हे फोटो आवडलेत तर, काही लोक जोक्स करत आहेत. काहीही असो हा ट्रेन्ड आता फॉलो होतो आहे. एका व्यक्तीने या स्टाईलला थेट 'टॉयलेट सीट' असं नाव ठेवलं आहे. या फॅशनमध्ये लोक दाढी आणि डोक्याच्या पुढच्या भागातले केस ठेवतात आणि मागचे केस काढून टाकतात. त्यामुळे लोकांचा चेहरा पंचिंग बॅगसारखा दिसू लागतो.
(एका फ्लॅटच्या किंमतीला विकलं जातंय अख्खं गाव; नागरिक घर सोडून पसार, काय आहे याचं)
कोरोनाची दुसरी लाट
गोल दाढीच्या या फॅशनचे फोटो व्हायरल झाल्यावर लोकांनी त्याला कोरोना साथीचा रोग म्हटलं आहे. काहींनी असं म्हटलं की कितीही अडचण असली तरी असे केस कोण ठेवणार? या स्टाईलसाठी, लोक त्यांच्या डोक्याचे सगळे केस पूर्णपणे काढत आहेत आणि फक्त दाढीच्या पुढच्या भागला जोडलेला ठेवत आहेत.
(साडी नेसून हुलाहुप्स; पाहा कमाल VIDEO! सोशल मीडिया मराठमोळ्या मुलीने गाजवला)
बरं एवढच नाही तर ही हेअर स्टाईल केल्यावर फोटोही शेअर करत आहेत. यापूर्वी लॉकडाऊनमध्ये काही इतर स्टाईल व्हायरल झाल्या होत्या. पण या स्टाईलवर लोक जोक्स कतर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fashion, Trending photo