मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IAS सचिन गुप्तांनी इंजिनिअरिंगनंतर दिली UPSC परीक्षा; तिसऱ्या प्रयत्नात देशात टॉपर

IAS सचिन गुप्तांनी इंजिनिअरिंगनंतर दिली UPSC परीक्षा; तिसऱ्या प्रयत्नात देशात टॉपर

IAS सचिन गुप्ता (IAS Officer Sachin Gupta) यांनी लहानपणापासूनच ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहिल होतं. त्यामुळे अपयश येऊनही प्रयत्न सोडले नाहीत.

IAS सचिन गुप्ता (IAS Officer Sachin Gupta) यांनी लहानपणापासूनच ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहिल होतं. त्यामुळे अपयश येऊनही प्रयत्न सोडले नाहीत.

IAS सचिन गुप्ता (IAS Officer Sachin Gupta) यांनी लहानपणापासूनच ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहिल होतं. त्यामुळे अपयश येऊनही प्रयत्न सोडले नाहीत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : देशातील सगळ्यात कठीण परीक्षा म्हणजे यूपीएससी परिक्षा पास होणं तसं सोपं नाही. यासाठी प्रचंड मेहनत आणि जिद्द असावी अंगी लागते. UPSC परीक्षा 3 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. प्रिलियम्स, मेन्स आणि इंटरव्यू. बऱ्याच विद्यार्थांना प्रीलियम मध्येच यश येत नाही.  त्यामुळे एक-दोन प्रयत्न करून UPSC परीक्षाचा नाद सोडून देतात. मात्र काही विद्यार्थी आपली जिद्द सोडत नाहीत. सातत्याने प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. हरियाणा राज्यातल्या सिरसा जिल्ह्यांमध्ये राहणारे IAS सचिन गुप्ता (IAS Officer Sachin Gupta) हे देखील त्यातलंच एक उदाहरण आहेत. त्यांनी 2017 साली सिव्हिल सेवा (civil Service) परीक्षेमध्ये 3रा रँक मिळवला आहे. सचिन गुप्ता यांनी थापर विश्व विद्यालय पटियालामधून (Thapar University, Patiala) मेकॅनिकल इंजिनिअरिंगची (Mechanical Engineering) डिग्री मिळवलेली आहे. लहानपणापासूनच त्यांनी सिव्हिल सेवा करण्याचा निर्णय घेतला होता.

(OMG! पठ्ठ्याने McDonald’s मधून इतकं खाणं ऑर्डर केलं की बिल झालं 1.86 लाख रुपये)

त्यामुळे इंजीनियरिंग नंतर लगेचच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र आयएएस (IAS Officer) होण्याचं स्वप्न सहजपणे पूर्ण झालं नाही. त्यासाठी तीन वेळा प्रयत्न करावा लागला. पहिल्या प्रयत्नात अपयश मिळवल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांनी देशांमध्ये तिसरा क्रमांक मिळवला.

(UPSCच्या तयारीसाठी वडिलांनी विकलं घर; प्रदीप सिंहांनी IAS होऊन कष्टाचं केलं चीज)

दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांनी 575वा रँक मिळवला होता.पण, सचिन गुप्ता यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पहिल्या दोन प्रयत्नांच्या चुका दुरुस्त करत जास्त मेहनतीने अभ्यास केला. सचिन गुप्ता यांनी सिलॅबसचा अभ्यास करून स्वतःची ताकद आणि कमतरता ओळखली आणि त्यानुसार अभ्यासाची तयारी केली.

(‘हा’ मित्र कधीच सोडणार नाही साथ; एकटेपणा कायमचा होईल दूर)

UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ते हाच सल्ला देतात. त्यांनी NCRTच्या पुस्तकांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिलेला आहे. सचिन गुप्ता यांनी सगळा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रिव्हिजन आणि पेपर सोडवण्याला महत्त्व दिलं.

First published:

Tags: Ias officer, Inspiring story, Success stories, Upsc exam