मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /OMG! पठ्ठ्याने McDonald’s मधून इतकं खाणं ऑर्डर केलं की बिल झालं 1.86 लाख रुपये

OMG! पठ्ठ्याने McDonald’s मधून इतकं खाणं ऑर्डर केलं की बिल झालं 1.86 लाख रुपये

McDonald's लव्हरने दिली लाखोंची ऑर्डर

McDonald's लव्हरने दिली लाखोंची ऑर्डर

ग्राहकाने केलेल्या ऑर्डरचं बिल पाहून McDonald's चे कर्मचारीही शॉक झाले.

    कॅनबेरा, 08 ऑगस्ट : जगभरातील अनेक लोक खाण्यापिण्याचे चांगलेच शौकीन असतात. विविध हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये किंवा गाड्यांवर जाऊन तिथले खाद्यपदार्थ खाऊन पाहण्याचा शौक असणाऱ्या व्यक्तीला किंवा मग एका वेळी भरपूर खाऊ शकणाऱ्या व्यक्तीलाही आपण फुडी म्हणतो. मात्र माणूस कितीही मोठा खवय्या असला तरी तो एका मर्यादेपर्यंतच खाऊ शकतो. मग ती मर्यादा कधी पोटाची असते, तर कधी खिशाची. ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीने मात्र एवढी मोठी ऑर्डर (Australia Man McDonald’s order) दिली की, त्याच्या बिलाची रक्कम वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

    मॅक्डॉनल्ड्स ही फास्ट फूड जॉईंट्सची चेन जगभरात पसरली आहे. जगभरात यांचे कित्येक चाहते आहेत. कित्येक लोक दिवसाच्या तीनही वेळा म्हटलं तरी मॅक्डॉनल्ड्समध्ये (McDonald’s biggest order) खाऊ शकतात. ऑस्ट्रेलियातील एक व्यक्ती मात्र या सर्व फॅन्सच्या (Australia McDonald’s viral order) वरचढ ठरला आहे. त्याने दिलेली ऑर्डर ऐकून मॅक्डॉनल्डच्या त्या शाखेतील कर्मचाऱ्यांचे डोळे पांढरे झाले. त्याच्या बिलाची एकूण रक्कम ही तब्बल 3,400 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.86 लाख रुपये (McDonald’s order worth 1.86 lakh) एवढी आली.

    हे वाचा - रहायचं असेल पावसाळ्यातही निरोगी तर, आहाराची घ्या खास काळजी; या चुका टाळाच

    या व्यक्तीच्या ऑर्डरमध्ये (Biggest McDonald’s order) 70 अँगस क्लबहाऊस बर्गर आणि 39 मॅकफॅमिली बॉक्स यांचा समावेश होता. सर्व मॅकफॅमिली बॉक्सेसमध्ये मिळून 234 बर्गर, 39 मॅकनगेट्स आणि 39 लार्ज फ्राईज एवढ्या गोष्टी येत होत्या. यासोबतच 100हून अधिक कोल्ड्रिंक्सही या पठ्ठ्याने मागवले होते. या ऑर्डरचा फोटो मॅक्डॉनल्डच्या एका कर्मचाऱ्याने (Australia McDonald’s biggest order photo) आपल्या फेसबुकवरून शेअर केला. सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच तो प्रचंड व्हायरल (Australia McDonald’s order viral pic) झाला.

    हे वाचा - मद्यपान करताना हे 5 पदार्थ ठरतात घातक Combination; चुकूनही खाऊ नका

    लोक यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ लागले होते. एकत्र एवढी मोठी ऑर्डर देणं कायद्याने गुन्हा तर नाही ना? असंही काही लोक मिश्किलपणे म्हणाले. एवढी मोठी ऑर्डर कशासाठी करण्यात आली होती, ही एखाद्या पार्टी वा पिकनिकसाठी होती का? की मग खरंच ही एकट्या माणसाने स्वतःसाठी केलेली ऑर्डर होती हे कळण्यास मार्ग नाही. पण एकंदरीत एकाच व्यक्तीने एकाच वेळी एवढी मोठी ऑर्डर (Australia man orders Burgers worth 1.86 lakh) करणे ही आश्चर्याची बाब आहे. त्यामुळेच या ऑर्डरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

    First published:
    top videos

      Tags: Food, Lifestyle