नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : देशभरातून लाखो विद्यार्थी युपीएससीची परीक्षा (UPSC Exam) देतात मात्र फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये यश (Success) मिळतं. यूपीएससी परीक्षा पास होणं तितकं सोपं नाही कारण त्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द अभ्यासवृत्ती आणि चुका दुरुस्त करण्याची सवय असावी लागते. UPSC परीक्षेसाठी सातत्याने प्रयत्न करत राहणारे विद्यार्थी यशस्वी होतात. आपल्या चुका सुधारून (Correcting mistakes) पुन्हा नव्याने अभ्यास केला तर, नक्कीच यश मिळू शकतं. आयएएस ऑफिसर अंकिता चौधरी (IAS Ankita Chaudhary) यांनी 2018 मध्ये यूपीएससीची परीक्षा पास करून अशाच प्रकारे यश मिळवलं.
(IAS अधिकारी नम्रता जैन त्यांच्या जिद्दीला सलाम! IPS होऊनही दिली UPSCची परीक्षा)
हरियाणाच्या एका छोट्याशा गावांमध्ये राहणाऱ्या अंकिता (IAS Ankita Chaudhary) यांनी यूपीएससीचा प्रवास आपल्या मेहनतीने पूर्ण केला. पहिल्या प्रयत्न त्यांना अपयश आलं मात्र, त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं.
(‘या’ एकाच राशीला ऑगस्टमध्ये भाग्यवान होण्याची संधी; शुक्र कृपेने वाढणार संपत्ती)
अंकिता यांचं सुरुवातीचे शिक्षण हरियाणामधील रोहतकमध्ये (Rohtak, Haryana) झालं आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये (Delhi) त्यांनी ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन करत असताना त्यांनी UPAS परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
(Chanakya Niti: लहान वयात मुलांवर करा ‘असे’ संस्कार; प्रगतीपासून रोखू शकणार नाही)
पोस्ट ग्रॅज्युएशन आणि UPSC असा दोघांचाही अभ्यास एकत्र केला. मास्टर्स झाल्यावर त्यांनी UPSCची परीक्षेच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरूवात केली. पहिल्या प्रयत्नात अंकिता यांना अपयश आलं पण, त्यांनी आपल्या चुकांचा अभ्यास करून त्या दुरुस्त करत दुसरा प्रयत्न केला आणि 14 रॅंक मिळवत आयएएस ऑफिसर(IAS officer) होण्याचा आपलं स्वप्न पूर्ण केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ias officer, Inspiring story, Success stories, Upsc exam