जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ‘या’ एकाच राशीला ऑगस्टमध्ये भाग्यवान होण्याची संधी; शुक्र कृपेने वाढणार संपत्ती

‘या’ एकाच राशीला ऑगस्टमध्ये भाग्यवान होण्याची संधी; शुक्र कृपेने वाढणार संपत्ती

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) ऑगस्ट महिन्यात एका राशीवर शुक्राची कृपा होणार आहे, नोकरी,व्यापारात प्रगती होणार, प्रेमसंबंध सुधारणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 05 ऑगस्ट :  ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) ग्रहांचे स्थान बदलण्याचा राशींवर  (Zodiac Sing)  परिणाम होत असतो. ऑगस्ट (August) महिन्यामध्ये काही ग्रह आपलं स्थान बदलणार आहेत. हे ग्रह दुसऱ्या राशींमध्ये स्थानापन्न झाल्यामुळे सगळ्याच राशींवर परिणाम (Effect) होणार आहे. ऑगस्ट महिन्याचा सुरुवातीचा काळ काही राशींसाठी शुभ समाचार घेऊन आलेला आहे. मात्र, काही राशींना या महिन्यात सावधान राहण्याचा इशारा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ऑगस्ट महिन्यामध्ये मकर राशीवर शुक्र ग्रहाचा प्रभाव जास्त पडल्याने त्यांची प्रगती होणार आहे. शुक्राची स्थिती बदलल्यामुळे धनलाभाचे योग होतील. मकर राशीसाठी हा महिना अतिशय चांगला मानला जातोय. पण, मकर राशीला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळात थोड्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. मात्र ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये परिस्थिती सुधारेल. करिअरच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभ मानला जातोय. नोकरीमध्ये प्रगती होईल, आर्थिक वृद्धीचे मार्गही सापडतील. मात्र, या काळात थोडं सतर्क देखील राहावे लागेल. 11 ऑगस्टला शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे मकर राशीची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. मकर राशीसाठी हा महिना शुभ ठरणार आहे. व्यापारामध्ये देखील फायदा होईल. नवीन उद्योगाच्या संधी मिळतील. मात्र खर्चांना आळा घालावा लागेल. 26 ऑगस्टला बुद्ध ग्रह 9व्या घरात जाईल. त्यानंतर व्यापारामध्ये आणखीन फायदा (Benefits)  होईल. प्रेमसंबंधांवर देखील शुक्राचा प्रभाव असणार आहे. ऑगस्ट महिना प्रेम संबंधासाठी उत्तम मानला जातोय. या काळात नातेसंबंध मजबूत होतील. जास्तीतजास्त काळ जोडीदाराबरोबर व्यतीत करण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग येतील. मात्र या काळामध्ये आरोग्याची देखील काळजी घ्यावी. बाहेरचे पदार्थ खाताना सावध रहावं.(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात