दिल्ली, 22 जून : UPSC परीक्षेमध्ये यश मिळवून IAS होण्याचं स्वप्न पूर्ण करणारे असेच ध्येय्यवेडे असतात. UPSC परीक्षेची तयारी देशभरातील लाखो विद्यार्थी करतात मात्र, फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये (UPSC Exam) यश मिळतं. आर्थिक परिस्थितीमुळे पुस्त खरेदी करणं कठीण असणाऱ्या मुलाने वाईट परिस्थितीही आयएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न पूर्ण केलंय.
मनात ध्यास घेतला तर अपयश कधीच पदरात पडत नाही असं म्हणतात. IAS ऑफिसर बनण्याचं स्वप्न पाहणारे लोक देखील असेच असतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी कितीही मेहनत करण्याची त्यांची तयारी असते. राजस्थानचे देशल दान यांनी दहावीमध्ये असताना UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.
(इंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच)
त्यांचा जन्म राजस्थानच्या (Rajasthan) जैसलमेर जिल्ह्यातील सुमालियाई गावात झालेला होता. त्यांना एकूण सात भावंडे होती. सात भावंडांचं शिक्षण आणि खाण्यापिण्याचा खर्च उचलण्या इतकी वडिलांची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे कमी वयातच त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. त्यांचे वडील घरखर्च चालवण्यासाठी चहा विकायचे यांनी बारावीपर्यंत शिक्षण कोटा इथे पूर्ण केलं तर, आयआयटी जबलपूर मध्ये ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर UPSCची तयारी सुरू केली. त्यांचे वडिल त्यांना आर्थिक मदत करत होते.
(IAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात! चंद्रताल लेकचे PHOTO)
त्यांनी 2017 मध्ये UPSCची परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नात यश मिळवत AIR 82 रँक मिळवला.
मोठ्या भावाच्या मृत्यूमुळे खरंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. देशल दान यांचा मोठा भाऊ नेव्हीमध्ये होते. आयएनएस सिंधुदुर्गमध्ये ड्युटी करत असताना ते शहीद झाले.
(लो ब्लड प्रेशरचा त्रास होतोय? जाणून घ्या सोपे उपाय)
त्यानंतर त्याचं पूर्ण आयुष्य बदललं. आपल्या घराची आर्थिक परिस्थिती बदलायची असेल तर मोठं ध्येय गाठावं लागेल असा विचार देशल दान यांनी केला. कधीकाळी बिकट परिस्थितीमुळे पुस्तक खरेदी करण्या इतके पैसे नसायचे. ते देशल दान यांनी आज IAS ऑफिसर बनून कष्टाळू वडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Inspiring story, Success stories, Success story, Upsc