लो ब्लड प्रेशरचा त्रास होतोय? जाणून घ्या सोपे उपाय

रक्तदाबाची समस्या असेल तर घरगुती उपाय करू शकता.

ब्लडप्रेशर जेव्हा 120/80 असतं तेव्हा सामान्य किंवा नॉर्मल समजलं जातं. परंतु, तेच जर 90/60 या रेंजमध्ये येतं तेव्हा त्यास हायपोटेन्शन (Hypotension) किंवा लो ब्लड प्रेशर (Low Blood Pressure) असं म्हणतात.

  • Share this:
मुंबई, 19जून-  आपण उच्च रक्तदाब (High Blood Pressure) किंवा हाय ब्लडप्रेशरविषयी बऱ्याचदा ऐकलं आहे. परंतु, जेव्हा रक्तदाब नॉर्मलपेक्षा कमी होतो तेव्हा देखील आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. रक्तदाब कमी होणं हे तुमच्या आरोग्यादृष्टीने गंभीर संकेत असतात.  ब्लडप्रेशर जेव्हा 120/80 असतं तेव्हा सामान्य किंवा नॉर्मल समजलं जातं. परंतु, तेच जर 90/60 या रेंजमध्ये येतं तेव्हा त्यास हायपोटेन्शन (Hypotension) किंवा लो ब्लड प्रेशर (Low Blood Pressure) असं म्हणतात. हेल्थलाईननं दिलेल्या माहितीनुसार, ब्लड प्रेशर कमी झाल्यास शरीरातील महत्वाचे अवयव (Organs) जसे की मेंदू, हृदय, फुफ्फुसं, किडनी आदींपर्यंत रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. त्यामुळे या अवयवांवर परिणाम होतो. अनेकदा लो ब्लड प्रेशरमुळे हार्ट अॅटॅक (Heart Attack) किंवा ब्रेनस्ट्रोकही (Brain Strock) होतो. जर तुम्ही लो ब्लड प्रेशरचा सामना करत असाल तर त्यासाठीच्या घरगुती उपायांविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.जाणून घेऊया काय आहेत घरगुती उपाय... जेवणाचे लहान लहान भाग करा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये जर तुम्ही जड अन्नपदार्थांचे (Food) सेवन करत असाल तर संपूर्ण जेवण 5 ते 6 विभागून घ्या. जेवणामध्ये जास्त अंतर ठेवू नका. ब्लड प्रेशर कमी होऊ नये, यासाठी दिवसभरात काही ना काही खात रहा किंवा जेवण विभागून घ्या. ही पध्दत तुम्ही मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी देखील वापरु शकता. मीठाचं सेवन अधिक प्रमाणात मीठाचं (Salt) सेवन करणं त्रासदायक ठरु शकतं. मात्र ज्या व्यक्तींना लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांना मीठाची आवश्यकता असते. अशा रुग्णांनी एक चमचा नैसर्गिक मीठाचचं दिवसभरात सेवन केलं पाहिजे. जर तुम्ही उन्हाळ्यात व्यायाम करत असाल तर मीठयुक्त लिंबू पाणी स्वतःसोबत ठेवणं आवश्यक आहे. जर तुम्हाला काही त्रास जाणवला तर पटकन हे पेय घ्यावे. यामुळे तुम्हाला आराम वाटेल. (हे वाचा: डायबेटिसच्या रुग्णांची दूध प्यायल्याने साखर वाढते? घाबरू नका; वाचा नवीन संशोधन ) भरपूर पाणी प्या भरपूर प्रमाणात लिक्विडचं (Liquid) सेवन करावं. दिवसभरात किमान 2 ते 3 लीटर पाणी प्यावं. या व्यतरिक्त अशा रुग्णांनी नारळ पाणी, बेलाचं सरबत, कैरीचं पन्हं, लिंबू पाणी यापैकी कोणतंही लिक्विड सातत्यानं घ्यावं. कॉफी प्या जर तुमचं ब्लडप्रेशर लो होत असेल तर तातडीनं चहा (Tea) किंवा कॉफी (Coffee) प्यावं. ही पेय तुमचं ब्लडप्रेशर नॉर्मल करतील आणि तुम्हाला आराम वाटेल. (हे वाचा: International Yoga day: ही 4 योगासनं तुमची पचनशक्ती वाढवण्यास करतील मदत) तुळशीचं पान तुळशीत पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन सी हे घटक असतात. हे घटन ब्लडप्रेशर स्थिर ठेवतात. जर तुमचं ब्लडप्रेशर लो होत असेल तर तातडीने तुळशीची 4 ते 5 पानं खावीत. यामुळे देखील आराम पडू शकेल. बदाम दूध रात्रीच्या वेळी 4 ते 5 बदाम (Almonds) पाण्यात भिजवून सकाळी ते पाण्यात उकळून घ्यावेत. ते थंड झाल्यावर किसून प्यावं. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं. मनुका मनुका रात्रभर पाण्यात भिजून ठेवाव्यात आणि सकाळी त्या खाव्यात. यामुळे तुमचं ब्लड प्रेशर लो होणार नाही.
Published by:Aiman Desai
First published: