जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / इंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याचा ध्यास

इंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याचा ध्यास

इंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याचा ध्यास

पाचव्या वेळेस त्या इंटरव्यू राऊंडपर्यंत पोहोचल्या मात्र, तरीही फायनल लिस्टमध्ये त्यांची निवड झाली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली,21 जून : नमिता शर्मा यांनी 2018  साली UPSC परीक्षेमध्ये 145 वा रँक मिळवला आहे. आता त्या IAS अधिकारी बनलेल्या आहेत. नमिता शर्मा (IAS Namita Sharma) यांची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. नमिता यांनी यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) 4 वेळा दिली. त्यावेळी त्यांना प्रिलियमही क्लिअर करता आल्या नाहीत. तेव्हा त्यांना आपल्या अभ्यासाची पद्धत चुकीची आहे असं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी अभ्यासाची रणनीती (Study Strategy) बदलली आणि पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात केली. पाचव्या वेळेस त्या इंटरव्यू राऊंडपर्यंत पोहोचल्या मात्र, तरीही फायनल लिस्टमध्ये त्यांची निवड झाली नाही. तरीही परत UPSCची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तब्बल 6 वेळा त्यांनी UPSCची परीक्षा दिली आणि अखेर IAS अधिकारी बनल्या. आपल्या अनुभवावरून त्या दुसऱ्यांच्या अभ्यासाची रणनीती फॉलो न करण्याचा सल्ला देतात. नमित सांगतात, UPSCची परीक्षा देण्यासाठी स्वतः अभ्यासाची तयारी करावी. ( लाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा ) स्वतः नोट्स तयार कराव्यात आणि रिविजनवर भर द्यायला हवा. यासाठी दिवसाचे शेड्युल तयार करावं आणि सतत मेहनत करत राहावी. परीक्षेमध्ये अपयश आलं तरी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय घ्यावा असं नेहा शर्मा सांगतात. ( Ease Of Living Index: भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कुठलं? पाहा मुंबई कुठे? ) त्या सांगतात जेव्हा, UPSCची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेक जणांनी परीक्षेच्या फंदात न पडण्याचा सल्ला दिला होता. परीक्षेत अपयश मिळायला लागल्यानंतर तर लोक डीमोटिवेट करायला लागले. मात्र, त्या हिंमत हारल्या नाहीत. पाचव्या प्रयत्नात अपयश आल्यानंतरही त्यांनी 2018साली सहावा प्रयत्न केला आणि यशस्वी झाल्या. ( IAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात! चंद्रताल लेकचे PHOTO ) देशभरातून लाखो विद्यार्थी दर वर्षी यूपीएससीची परीक्षा देतात. अनेक विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेत यश मिळतं किंवा अपयश. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतःची एक कहाणी असते नमिता शर्मा यांची ही कहाणी देखील UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात