मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

उमेदवारांची वाढली धडधड! UPSC Mains निकालाची तारीख ठरली? अवघ्या दिवसांत लागणार Result

उमेदवारांची वाढली धडधड! UPSC Mains निकालाची तारीख ठरली? अवघ्या दिवसांत लागणार Result

संघ लोक सेवा आयोग

संघ लोक सेवा आयोग

आयोगाच्या upsc.gov.in या वेबसाइटवर निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे निकालाआधी कट ऑफ कसा चेक करणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 04 डिसेंबर: UPSC Mains परीक्षेच्या निकालाची वाट बघणाऱ्या उमेदवांसाठी मोठी बातमी आहे. UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मुख्य चा निकाल लवकरच येणार आहे. युनियन लोकसेवा आयोग आतापासून कधीही UPSC CSE Mains 2022 चा निकाल जाहीर करू शकतो. आयोगाच्या upsc.gov.in या वेबसाइटवर निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे निकालाआधी कट ऑफ कसा चेक करणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) च्या नागरी सेवा मुख्य परीक्षा (CSE Mains) 2022 चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की 7 डिसेंबरपर्यंत यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार UPSC वेबसाइटला भेट देऊन ते तपासण्यास सक्षम असतील.

MAHAGENCO Recruitment: महिन्याचा 70,000 रुपये पगार, तब्बल 661 जागा; शेवटचे काही दिवस शिल्लक; करा अर्ज

ही परीक्षा 16 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत घेण्यात आली. संघ लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत बसलेले उमेदवार थेट लिंकवरून त्यांचा UPSC मुख्य निकाल 2022 तपासू शकतील.

UPSC ने 16, 17, 18, 24 आणि 25 सप्टेंबर रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन शिफ्टमध्ये (पहिला दिवस वगळता) आयोजित केली होती. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते 5 या वेळेत घेण्यात आली.

आयोग पीडीएफ स्वरूपात निकाल जाहीर करेल. तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लॉगिनची आवश्यकता नाही. UPSC निकाल तपासण्यासाठी चरणवार मार्ग जाणून घ्या-

ओपन डिस्टंस आणि ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमाबाबत यूजीसीनं घेतला `हा` मोठा निर्णय

असा चेक करा तुमचा UPSC चा निकाल

UPSC वेबसाइट upsc.gov.in वर जा.

निकाल जाहीर झाल्यानंतर, तुम्हाला मुख्यपृष्ठाच्या शीर्षस्थानी UPSC CSE मुख्य निकाल 2022 लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.

क्लिक केल्यावर, तुमच्या संगणक/मोबाईल स्क्रीनवर एक PDF फाइल उघडेल. आता पेजच्या सर्च ऑप्शनवर जा, तुमचा रोल नंबर भरा आणि एंटर करा.

जर तुमचा रोल नंबर त्या यादीत असेल तर तो हायलाइट केला जाईल. म्हणजे तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहात.

या PDF मध्ये तुम्हाला UPSC मुख्य परीक्षेचा कट ऑफ देखील मिळेल. आयोगाकडून गुण नंतर अपलोड केले जातील. यासाठी तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागेल.

IT Jobs: वर्क फ्रॉम करण्याची सर्वात मोठी संधी; 'या' आयटी कंपनी ग्रॅज्युएट्सच्या शोधात; करा अप्लाय

जर तुम्ही मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली असेल, तर तुम्हाला UPSC DAF 2 म्हणजेच तपशीलवार अर्ज भरावा लागेल. त्याशिवाय तुम्ही UPSC मुलाखतीला उपस्थित राहू शकणार नाही. हा फॉर्म निकाल जाहीर झाल्यानंतर आयोगाच्या वेबसाइटवर जारी केला जाईल. ते तुम्हाला विहित मुदतीत भरावे लागेल, असे आयोगाने म्हटले आहे. अन्यथा तुमचा उमेदवारी अर्ज रद्द केला जाईल.

First published:

Tags: Career, Career opportunities, Ias officer, Upsc, Upsc exam