मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IT Jobs: वर्क फ्रॉम करण्याची सर्वात मोठी संधी; 'या' आयटी कंपनी ग्रॅज्युएट्सच्या शोधात; करा अप्लाय

IT Jobs: वर्क फ्रॉम करण्याची सर्वात मोठी संधी; 'या' आयटी कंपनी ग्रॅज्युएट्सच्या शोधात; करा अप्लाय

तुम्हीही टेक कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉब शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण सध्या एक आघाडीची टेक कंपनी हायरिंग करत आहे.

तुम्हीही टेक कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉब शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण सध्या एक आघाडीची टेक कंपनी हायरिंग करत आहे.

तुम्हीही टेक कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉब शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण सध्या एक आघाडीची टेक कंपनी हायरिंग करत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 डिसेंबर:  तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे अनेक टेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ही सुविधा कर्मचाऱ्यांना दिली. कोरोनाचा धोका आणि साथ दोन्ही कमी झालंय, त्यामुळे बऱ्याच कंपन्या कर्मचाऱ्यांना परत ऑफिसला बोलवत आहेत, अशातच काही कंपन्यांनी मात्र वर्क फ्रॉम होम कायम ठेवलंय. या टेक कंपन्या तर नव्यानं नोकरीवर घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही घरून काम करण्याची सुविधा देत आहेत. तर काही कंपन्या हायब्रिड मोडवर काम करत आहेत. तुम्हीही टेक कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉब शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण सध्या एक आघाडीची टेक कंपनी हायरिंग करत आहे. या संदर्भात techgig डॉट कॉमने वृत्त दिलंय.

क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स

हेक्झावेअर ही आघाडीची टेक कंपनी टेक्नॉलाजी, आयटी बीपीएस आणि कन्सल्टिंग सर्व्हिसेस पुरवते. याच कंपनीत सध्या रिक्त जागा असून त्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नवीन कर्मचार्‍यांची नेमणूक कशी करताय? या प्रश्नाचं उत्तर देताना कंपनीने सांगितलं की, ‘हेक्झावेअर ही सध्याच्या काळात वेगाने वाढणारी कंपनी म्हणून कर्मचाऱ्यांना त्यांच्या पर्सनल ग्रोथसाठी कामाची संधी देतेय. त्यांना हुशार उमेदवारांसोबत उत्तम काम करण्याची आणि कंपनीच्या हाय प्रोफाइल क्लाएंट्सबरोबर काम करण्याची संधी मिळतेय. तसंच इथे काम करताना ते काम आणि त्यांचं पर्सनल आयुष्य यात संतुलन राखू शकतात.’ त्यात पुढे म्हटलंय,'माणसाची सर्जनशीलता आणि बुद्धी, डाटा आणि जबरदस्त अल्गोरिदम यांच्या मिलाफाला कामाला लावून माणूस आणि यंत्राच्या सहचर्याच्या अप्रतिम प्रवासाचा भाग व्हा.'

कंपनी सध्या विविध ओपन पोझिशन्ससाठी देशभरातील पात्र उमेदवारांकडून रिझ्युमे स्वीकारत आहे. तुम्हाला इतर क्षेत्रांतील उपलब्ध रिक्त पदांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटच्या करिअर पेजला भेट देऊन कंपनीच्या WFH/हायब्रिड पदांसाठी अर्ज करू शकता.

बेसिक्समध्ये गडबड की अभ्यासात लक्ष नसणे? नक्की का नापास होतात मुलं? सुधारा 'या' चुका

हेक्झावेअर जगभरातील, वैविध्यपूर्ण कर्मचार्‍यांना फ्लेक्झिबल शेड्युलिंग, पगारी सुट्टी आणि कामाच्या बाहेर त्यांच्या वैयक्तिक जीवनात अडचण येत असेल, तर त्यासाठी काउन्सेलिंग सर्व्हिसेस पुरवते.

ग्राहकांना मदत करून त्यांच्याशी जवळीक साधणं, हे कंपनीचे प्राथमिक ध्येय आहे. या गोष्टीमुळे कंपनीला धोरणात्मक फायदादेखील होईल. हेक्झावेअर ही डिजिटली एम्पॉवर्ड कंपनी आहे. तसेच ती वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक आहे. या कंपनीत 24,166 कर्मचारी काम करतात आणि कंपनी ग्राहकांच्या यशाला पहिलं प्राधान्य देत काम करते.

First published:

Tags: Career, Career opportunities, Jobs Exams