जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Tata Group : रतन टाटांचा PA आहे हा 30 वर्षीय तरुण, त्याला कशी मिळाली ही नोकरी?

Tata Group : रतन टाटांचा PA आहे हा 30 वर्षीय तरुण, त्याला कशी मिळाली ही नोकरी?

रतन टाटा मॅनेजर शांतनु नायडू

रतन टाटा मॅनेजर शांतनु नायडू

Ratan Tata’s manager Shantanu Naidu Salary : रतन टाटा यांचा पीए अवघ्या तीस वर्षांचा आहे. त्याला नोकरी कशी मिळाली याची एक खास स्टोरी आहे. जी आपण जाणून घेणार आहोत. शंतनू नायडूचा जन्म हा पुण्यातील आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 जून : दिग्गज उद्योगपती रतन टाटांसोबत एक मुलगा नेहमीच दिसतो. तो प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबतच असतो. रतन टाटांनी त्यांचा 85 वाढदिवस देखील याच तरुणासोबत साजरा केला होता. तो सावली प्रमाणे रतन टाटांसोबत असतो. या तरुणाचं नाव शंतनू नायडू असं आहे. शंतनू  टाटा यांचा प र्सनल असिस्टेंट आहे. एवढंच नाही तर रतन टाटांची या तरुणासोबत खूप जवळीक आहे. रतन टाटा या तरुणाला आपल्या मुलाप्रमाणे मानतात. शंतनू हा रतन टाटांच्या व्यवसायासोबतच त्यांच्या गुंतवणुकीही पाहतात. टाटा कंपनीमध्ये त्याला मॅनेजर हे पद आहे. शंतनू हा 30 वर्षांचा आहे. तो एक बिझनेसमन, इंजीनियर, सोशल मीडिया इंफ्लुएसर, लेखक आणि एंटरप्रेन्योर आहे. शंतनूने अमेरिकेच्या कॉर्नेल विश्वविद्यालयातून MBA चं शिक्षण घेतलं आहे. शंतनू नायडूचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात 1993 रोजी झाला होता. टाटा ग्रुपमध्ये काम करणारी त्याच्या कुटुंबातील तो 5 पिढी आहे. 2018 मध्ये अभ्यास केल्यानंतर, शंतनू भारतात परत आला आणि टाटा ट्रस्टच्या चेअरमन ऑफिसमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम करू लागला. रतन टाटा यांनी शंतनू नायडूच्या स्टार्टअप गुडफेलोजमध्ये गुंतवणूक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्यासाठी हा स्टार्टअप सुरू करण्यात आला आहे. टाटांचा या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास, कंपनीची जबाबदारी सोपवली; पगार वाचून डोळे होतील मोठे …या कारणामुळे रतन टाटांनी स्वतः शंतनूला केला होता फोन नायडूने टाटांसोबतच्या अनुभवाबद्दल‘I Came Upon a Lighthouse’ हे पुस्तकही लिहिले आहे. यामध्ये त्याने रतन टाटा यांनी त्यांना आपला असिस्टेंट का बनवले हे सांगितलंय. खरं तर, शंतनूला कुत्रे खूप आवडतात. मुंबईत भटक्या कुत्र्यांना अपघात होण्यापासून वाचवण्यासाठी त्याने त्यांच्या गळ्यात चमकणारी पट्टी बांधण्याची मोहीम सुरू केली होती. भटक्या कुत्र्यांसाठी केलेल्या कामामुळे रतन टाटा त्याच्यावर खूप प्रभावित झाले. रतन टाटा यांनाही कुत्रे खूप आवडतात. रतन टाटा शंतनू नायडूवर इतके प्रभावित झाले की त्यांनी स्वतः फोन करून शंतनूला त्यांचा पर्सनल असिस्टेंट बनण्याची ऑफर दिली. काय आहे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या यशाचं रहस्य? जे बदलेल तुमचं आयुष्य

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात