मराठी बातम्या /बातम्या /Viral /टाटांचा या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास, कंपनीची जबाबदारी सोपवली; पगार वाचून डोळे होतील मोठे

टाटांचा या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास, कंपनीची जबाबदारी सोपवली; पगार वाचून डोळे होतील मोठे

जे एन चंद्रशेखरन

जे एन चंद्रशेखरन

टाटा ही देशातील सर्वात मोठं मार्केट व्हॅल्युएशन असलेली कंपनी आहे. या कंपनीचे सीईओ एन. चंद्रशेखरन आहेत. ते रतन टाटांच्या खूप जवळचे मानले जातात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 16 मार्च :  टाटा ही देशातील सर्वात मोठं मार्केट व्हॅल्युएशन असलेली कंपनी आहे. या कंपनीचे सीईओ एन. चंद्रशेखरन आहेत. ते रतन टाटांच्या खूप जवळचे मानले जातात. बिझनेसची समज, प्लॅनिंग आणि कंपनीबद्दलची आपुलकी यामुळे ते टाटांचे विश्वासू आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून एन. चंद्रशेखरन 128 अब्ज डॉलरची कंपनी सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वात टाटाने 2022 या आर्थिक वर्षात 64267 कोटी रुपयांचं नेट प्रॉफिट मिळवलं आहे. 2017 मध्ये ते 36728 कोटी रुपये होतं. मागच्या पाच वर्षांत टाटा ग्रुपचा रेव्हेन्यू 6.37 लाख कोटींवरून 9.44 लाख कोटींवर पोहोचला आहे. कंपनीची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळणारे एन. चंद्रशेखरन यांचा यात मोठा वाटा आहे. आज त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या संदर्भात 'नवभारत टाइम्स'ने वृत्त दिलंय.

  एन. चंद्रशेखरन यांचा जन्म 1963 साली तमिळनाडूमध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचं बालपण गरिबीमध्ये गेलं. त्यांनी प्रचंड मेहनत करून यश मिळवलं. नटराजन चंद्रशेखरन हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांनी सुरुवातीचं शिक्षण तमिळमध्ये घेतलं ते आपल्या भावंडांबरोबत तीन किलोमीटर पायी शाळेत जायचे. ते अभ्यासात हुशार होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी कोइम्बतूर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून ग्रॅज्युएशन केलं. नंतर रिजनल इंजिनीअरिंग कॉलेज, तिरुचिरापल्ली इथून कम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये मास्टर्स पूर्ण केलं.

  हेही वाचा -    Viral Video : पार्कमध्ये घसरगुंडी खेळणं महिलेच्या अंगलट, पुढे झाली अशी अवस्था

  1987 साली टाटा कंपनीमध्ये झाले रुजू

  चंद्रशेखरन यांना टाटा कंपनीमध्ये तीन दशकं झाली आहेत. 1987 मध्ये ते कंपनीमध्ये इंटर्न म्हणून रुजू झाले होते. टीसीएसमध्ये इंटर्न म्हणून करिअरची सुरुवात करणारे चंद्रशेखरन आज कंपनीमध्ये टॉप पोझिशनवर आहेत. 2007 मध्ये त्यांना TCS चे सीओओ केलं गेलं. मग त्यांना सीईओची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात टीसीएसने यशाची शिखरं पादाक्रांत केली. टाटा-सायरस मिस्त्री वादानंतर टाटा सन्सची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ते टाटा कंपनीचे सीईओ होणाऱ्या सर्वांत तरुण सदस्यांपैकी एक ठरले होते.

  चंद्रशेखरन यांचा पगार किती

  चंद्रशेखरन टाटा कंपनीला यशाच्या नव्या शिखरावर नेत आहेत. पत्नी ललिता व मुलगा प्रणव हे त्यांचे कुटुंबीय आहेत. 2019 मध्ये चंद्रशेखरन यांचा पगार वर्षाकाठी 65 कोटी रुपये होता. 2021-22 मध्ये त्यांच्या पगारात मोठी वाढ करण्यात आली. सध्या त्यांचा वार्षिक पगार 109 कोटी रुपये आहे. ते भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सीईओंपैकी एक आहेत.

  मॅराथॉन रनर आहेत चंद्रशेखरन

  टाटा कंपनीचे बॉस एन. चंद्रशेखरन हे खूप फिटनेस फ्रिक आहेत. ते आपलं रुटीन कायम फॉलो करतात. ते रोज पहाटे चार वाजता उठून धावायला जातात. ते मॅरेथॉन रनर असून त्यांनी जगभरात अनेक मॅरेथॉन आणि हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला आहे. ते दरवर्षी किमान 4 मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावतात. 2008 पासून त्यांनी मॅरेथॉन धावण्यास सुरुवात केली होती, ती आजतागायत सुरू आहे.

  First published:
  top videos

   Tags: Ratan tata, Top trending, Viral