2/11 : भारतातल्या प्रसिद्ध उद्योगपतींमध्ये रतन टाटा यांच्या नावाचा समावेश होतो. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी टाटा समूहाला जगभरात ओळख मिळवून दिली आहे.
4/11 : आपलं काम हीच पूजा असावी, काम कोणतंही असो ते मन लावून आणि कष्टाने करा, असं रतन टाटा यांचं म्हणणं आहे.
5/11 : जीवनात काही मिळवायचं असेल, तर आधी विचार मोठे करा. मोठी स्वप्नं पाहिली तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही मेहनत कराल, असं रतन टाटा यांचं म्हणणं आहे.
6/11 : इतरांचा आदर राखणं हेदेखील यश टिकवून ठेवण्यामागचं रहस्य असतं. रतन टाटा इतके मोठे उद्योगपती असूनही लहान-मोठ्यांचा आदर राखतात. दुसऱ्यांचा नेहमीच आदर राखला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं.
7/11 : रतन टाटा यांच्या म्हणण्यानुसार सगळ्यात आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. स्वतःवर विश्वास असेल, तर कोणतंही काम अशक्य नसतं.
8/11 : पुढे जाण्यासाठी एकट्यानं नाही, तर सर्वांनी मिळून प्रवास केला पाहिजे, असं रतन टाटा यांना वाटतं. एकट्यानं थोडंच अंतर जाता येतं; मात्र सोबतीनं गेलं तर तुम्ही ठरवाल तिथे जाऊ शकता.
9/11 : जीवनात शिस्त असणं हा यश मिळवण्यासाठीचा पहिला नियम आहे. रतन टाटा सकाळी लवकर उठून सर्व कामं करतात. त्यांच्या आयुष्यात शिस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
10/11 : रतन टाटा यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही जेव्हा लोकांचा विश्वास मिळवता, तेव्हाच लोक तुमच्याशी जोडले जातात. यामुळेच लोक तुमचं काम आणि कंपनीवर विश्वास ठेवतात.
11/11 : आयुष्यात नेहमी शिकत राहिलं पाहिजे. तसंच एखाद्या कामाबाबत किंवा निर्णयाबाबत जोखीम पत्करण्याची तयारी दाखवली पाहिजे, असं रतन टाटा यांना वाटतं.