जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Success Story: "तू कलेक्टर आहेस का?" या एका वाक्यामुळे बदललं संपूर्ण आयुष्य; डॉक्टर झाली IAS ऑफिसर

Success Story: "तू कलेक्टर आहेस का?" या एका वाक्यामुळे बदललं संपूर्ण आयुष्य; डॉक्टर झाली IAS ऑफिसर

डॉक्टर असूनही IAS अधिकारी होण्याचा निर्णय

डॉक्टर असूनही IAS अधिकारी होण्याचा निर्णय

का खोचक वाक्यामुळे कोणाचं संपूर्ण आयुष्य कशाप्रकारे बदलून जाऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे IAS अधिकारी प्रियंका शुक्ला (Success story of IAS Priyanka Shukla)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मे: जर तुमच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही जगातील कोणतीही गोष्ट सहजपणे मिळवू शकता. तसंच समाजातील वाईट गोष्टींकडे बघून त्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर जिद्द असणं आवश्यक आहे. अशाच एका रणरागिणीची यशस्वी गाथा (Success Story) आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका खोचक वाक्यामुळे कोणाचं संपूर्ण आयुष्य कशाप्रकारे बदलून जाऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे IAS अधिकारी प्रियंका शुक्ला (Success story of IAS Priyanka Shukla). एका महिलेनं म्हंटलेल्या एका वाक्यामुळे प्रियांका यांनी डॉक्टर असूनही IAS अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. प्रियंका शुक्लाने किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमधून MBBS चे शिक्षण घेतले होते, परंतु प्रियांकाच्या संपूर्ण कुटुंबाची इच्छा होती की तिने मोठे होऊन IAS अधिकारी व्हावे. त्याचे वडील हरिद्वारच्या जिल्हा दंडाधिकारी विभागात कार्यरत होते. कलेक्टर म्हणून आपल्या घरासमोर प्रियांकाच्या नावाची नेमप्लेट छापून पाहण्याचे तिच्या वडिलांचे स्वप्न होते असं प्रियांका सांगतात. ही बातमी ‘झी न्यूज हिंदी’ ने प्रकाशित केली आहे. जिद्दीला सलाम! गंभीर प्रकृती पुढेही मानली नाही हार; किराणा दुकानदाराच्या मुलानं केली UPSC क्रॅक प्रियांकाने MBBS प्रवेश परीक्षा पास केली आणि किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनऊमध्ये प्रवेश घेतला. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी लखनऊमध्येच प्रॅक्टिस सुरु केली. प्रियांका डॉक्टर झाल्याचा खूप आनंद झाला, पण डॉक्टरेट करत असताना घडलेल्या एका घटनेने त्यांच्या आयुष्याचे ध्येयच बदलून टाकले. एकदा प्रियांका झोपडपट्टी भागात लोकांची चौकशी करण्यासाठी गेली होती. तपासादरम्यान प्रियांकाने पाहिले की एक महिला गलिच्छ पाणी पीत होती आणि आपल्या मुलालाही पाजत होती. प्रियांकाने त्या महिलेला घाणेरडे पाणी पिण्यास नकार दिला, त्यावर ती महिला मागे वळून म्हणाली, “तुम्ही कुठे कलेक्टर आहात का?” हे ऐकून प्रियांका स्तब्ध झाली आणि पूर्णपणे हादरल्या, त्यानंतर तिने कलेक्टर होण्याचा निर्णय घेतला. UPSC टॉपर म्हणते, “पहिल्या नंबरची अपेक्षा नव्हती!” वाचा श्रुती शर्माचा प्रेरणादायी प्रवास प्रियांकाने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा पहिलाच प्रयत्न केला पण ती नापास झाल्या. त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आणि शेवटी 2009 मध्ये UPSC परीक्षा पास झाली. IAS अधिकारी झाल्यानंतर प्रियांकाने लोकांचे जीवन बदलणे हे त्यांनी ध्येय बनवले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात