मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

जिद्दीला सलाम! गंभीर प्रकृती पुढेही मानली नाही हार; किराणा दुकानदाराच्या मुलानं केली UPSC क्रॅक

जिद्दीला सलाम! गंभीर प्रकृती पुढेही मानली नाही हार; किराणा दुकानदाराच्या मुलानं केली UPSC क्रॅक

रामेश्वर सब्बनवाड

रामेश्वर सब्बनवाड

असं म्हणतात जिद्द असली की आयुष्यात काहीच अशक्य नसतं. अशीच काहीशी प्रेरणादायी कहाणी आहे रामेश्वरची.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 30 मे: नुकताच UPSC चा निकाल (UPSC Result 2022) जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्मा (UPSC Topper Shruti Sharma) हिने प्रथम क्रमांक (UPSC topper) पटकावला आहे. मात्र यंदा एकूण 685 उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यात महाराष्ट्रातल्या 40 हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. या 40 जणांपैकीच एक आहे उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावातील तरुण रामेश्वर सब्बनवाड (Success story of Rameshwar Sabanwad). असं म्हणतात जिद्द असली की आयुष्यात काहीच अशक्य नसतं. अशीच काहीशी प्रेरणादायी कहाणी आहे रामेश्वरची.

नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC परीक्षेत रामेश्वरने 202 रँक मिळवली आहे. मात्र ही रँक मिळवणं त्याच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. रामेश्वरच्या घरी स्वतःची कणभर शेती आहे. त्या शेतीतून उदरनिर्वाह कसा करणार म्हणून रामेश्वरचे वडील हे किराण्याचं दुकान चालवतात तर आई मजुरी करते. मात्र इतक्या गंभीर आर्थिक परिस्थितीवर मात करत रामेश्वरने UPSC ची परिल्सज दुरुस्त्या प्रयत्नात पास केली आहे.

UPSC टॉपर म्हणते, "पहिल्या नंबरची अपेक्षा नव्हती!" वाचा श्रुती शर्माचा प्रेरणादायी प्रवास

रामेश्वरचं संपूर्ण प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावात झालं तर यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण लातूर जिल्ह्यात झालं. मात्र यानंतर उच्च शिक्षणासाठी रामेश्वरला पुण्यात यावं लागलं. पुण्यात शासकीय महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्याने काही महिने खासगी नोकरी केली. तसंच त्याने काही महिने मुलांना शिकवणी देण्याचंही काम केलं.

आईची होती इच्छा

मात्र हे सर्व काम करत असताना, मुलानं चांगलं शिकून कलेक्टर व्हावं अशी इच्छा त्यांच्या आईची होती. म्हणूनच रामेश्वरनं UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. 2020 मध्ये रामेश्वरने अखंड मेहनत करून मुलाखतीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं. मात्र काही मार्कांनी निराश हाती आली. मात्र यंदा रामेश्वरनं मनाशी निर्धार केला आणि UPSC परीक्षा crack करत इतिहास घडवला. आपल्या हवेतून UPSC पास करणारा तो पहिला विद्यार्थी ठरला.

मोठी बातमी! UPSC 2021 परीक्षेचा निकाल अखेर जाहीर; श्रुती शर्माने मारली बाजी

2018 मध्येच केला होता निर्धार

इथपर्यंत येण्याचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. 2018 साली काही आजारामुळे रामेश्वरला ICU मध्ये दाखल करण्याची वेळी आली होती. त्यावेळी आरोग्य यंत्रणेची व्यवस्था बघून त्याने ही यंत्रणा सुधरवण्याचा आणि ग्रामीण भागातील तरुणांना यामुळे रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला होता असं रामेश्वर यानं सांगितलं आहे. म्हणूनच तो आजकालच्या तरुण मुलामुलींसाठी प्रेरणा आहे.

First published:

Tags: Career, Maharashtra News, Success, Success story, Upsc, Upsc exam