मराठी बातम्या /बातम्या /करिअर /UPSC टॉपर म्हणते, "पहिल्या नंबरची अपेक्षा नव्हती!" वाचा श्रुती शर्माचा प्रेरणादायी प्रवास

UPSC टॉपर म्हणते, "पहिल्या नंबरची अपेक्षा नव्हती!" वाचा श्रुती शर्माचा प्रेरणादायी प्रवास

वाचा श्रुती शर्माचा प्रेरणादायी प्रवास

वाचा श्रुती शर्माचा प्रेरणादायी प्रवास

यंदा एकूण 685 उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यात महाराष्ट्रातल्या 40 हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. यंदाची टॉपर (UPSC AIR 1) ठरलेली श्रुती शर्मा कोण आहे, तिने कुठून शिक्षण घेतलं आहे, हे जाणून घेऊया.

  मुंबई, 30 मे:  केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 (UPSC 2021 Results) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्मा (Shruti Sharma) हिने प्रथम क्रमांक (UPSC topper) पटकावला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या चारही क्रमांकावर यंदा मुलींनी बाजी मारली आहे. श्रुतीनंतर दुसर्‍या क्रमांकावर अंकिता अग्रवाल (Ankita Agarwal), तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला, (Gamini Singla) तर चौथ्या क्रमांकावर ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) आहे. यंदा एकूण 685 उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यात महाराष्ट्रातल्या 40 हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. यंदाची टॉपर (UPSC AIR 1) ठरलेली श्रुती शर्मा कोण आहे, तिने कुठून शिक्षण घेतलं आहे, हे जाणून घेऊ या. 'एबीपी न्यूज'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  दिल्ली विद्यापीठ, जेएनयूमध्ये घेतलं शिक्षण

  उत्तर प्रदेशच्या बिजनौर शहरातली रहिवासी असणाऱ्या श्रुतीने दिल्लीचं सेंट स्टीफन्स कॉलेज (Saint Stephan College) आणि जेएनयूमधून (JNU) शिक्षण घेतलं आहे. ती इतिहास विषयाची विद्यार्थिनी आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर तिने जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शिअल कोचिंग अ‍ॅकॅडमीमधून (Jamia RCA) यूपीएससीची तयारी केली होती. दोन वर्षांपर्यंत ती जामियामध्ये (Jamia RCA) कोचिंग घेत होती.

  मोठी बातमी! UPSC 2021 परीक्षेचा निकाल अखेर जाहीर; श्रुती शर्माने मारली बाजी

  'पहिला क्रमांक येईल असं वाटलं नव्हतं'

  निकाल घोषित झाल्यानंतर श्रुतीने (Shruti Sharma Reaction) त्यावर आश्चर्य व्यक्त केलं. ती म्हणाली, की या वर्षी ती परीक्षेत उत्तीर्ण होईल याबद्दल तिला खात्री होती; मात्र थेट पहिला क्रमांक येईल हे आपल्याला अनपेक्षित होतं असं तिने सांगितलं. या परीक्षेत ऑल इंडिया फर्स्ट रँक (AIR 1) मिळवणाऱ्या श्रुतीला आयएएस (Shruti Sharma UPSC) व्हायचं आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याचं तिचं स्वप्न आहे. 'दैनिक जागरण'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  पहिल्या पाचमध्ये चार मुली

  यंदाच्या टॉपर्समध्ये पहिल्या पाचात चार मुलींचा समावेश आहे. पाचव्या क्रमांकावर उत्कर्ष द्विवेदी, सहाव्या क्रमांकावर यक्ष चौधरी, सातव्या क्रमांकावर सम्यक जैन, आठव्या क्रमांकावर इशिता राठी, नवव्या क्रमांकावर प्रीतम कुमार, तर दहाव्या क्रमांकावर हरकीरत सिंह रंधावा (UPSC top ten students) आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पुण्याच्या शुभम भिसारे याने 97वा क्रमांक पटकावला आहे. अक्षय वखारे याने 203वा, ईशान टिपणीस याने 248वा, तर रोशन देशमुख आणि अश्विन गोळपकरने अनुक्रमे 451 आणि 626 वा क्रमांक (UPSC Maharashtra students) पटकावला आहे.

  प्राध्यापकांनो, त्वरा करा, 'या' जिल्ह्यातील AIIMS मध्ये 34 जागा रिक्त; करा अर्ज

  या ठिकाणी पाहा निकाल

  केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा 2021चा अंतिम निकाल आज (30 मे) जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि मुलाखत दिलेले सर्व उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर (upsc.gov.in) हा निकाल पाहू शकतील.

  First published:

  Tags: Career, Exam result, Ias officer, Success story, Upsc, Upsc exam