मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बापरे! देवाची परीक्षा घेण्यासाठी स्वतःसह लेकीचाही जीव घातला धोक्यात; आईने ताशी 193 किमी स्पीडने सुसाट पळवली कार

बापरे! देवाची परीक्षा घेण्यासाठी स्वतःसह लेकीचाही जीव घातला धोक्यात; आईने ताशी 193 किमी स्पीडने सुसाट पळवली कार

देवाची परीक्षा घेण्यासाठी महिलेने जीवघेणा मार्ग निवडला.

देवाची परीक्षा घेण्यासाठी महिलेने जीवघेणा मार्ग निवडला.

देवाची परीक्षा घेण्यासाठी महिलेने जीवघेणा मार्ग निवडला.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 15 जुलै : देवाला (God) प्रत्यक्षात कुणी पाहिलं नाही. त्यामुळे काहींचा देवावर बिलकुल विश्वास नसतो तर काहींचा देवावर इतका विश्वास असतो की ते आपलं संपूर्ण आयुष्यच देवावर सोडून देतात. काही तरी मिळवण्यासाठी असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरील असंच किती तरी लोक देवावर अवलंबून राहतात आणि संकटं आली की शक्यतो देवाच्या मूर्तींना पाण्यात ठेवून किंवा इतर मार्गांनी देवाची परीक्षा (God test) घेऊन तू खरंच असशील तर मला या संकटातून बाहेर काढ असं देवाला सांगतात. पण एका महिलेने तर हद्दच पार केली. तिने देवाची परीक्षा (God testing) घेण्यासाठी चक्क स्वतःसह आपल्या लेकीचाही जीव धोक्यात घातला (Woman endangered daughter's life). अमेरिकेतील 31 वर्षीय महिलेने देवाची परीक्षा घेण्यासाठी जीवघेणा मार्ग निवडला (To test god woman running car in high speed). तिने स्पीडने गाडी चालवत देवाची परीक्षा घेतली. महत्त्वाचं म्हणजे गाडीत ती एकटीच नव्हती तर तिने आपल्या 11 वर्षांच्या मुलीलाही आपल्या सोबत घेतलं आणि कार चक्क 193  किमी प्रति तास वेगाने सुसाट पळवली. हे वाचा - OMG! शिजवायला गेली अंडं पोळून निघाला चेहरा; ऑनलाईन रेसिपी फंडा पडला महागात ओहायोमध्ये (Ohio,United States) राहणारी ही महिला आपल्या आयुष्याला कंटाळली होती. आपल्या आयुष्यातील समस्यांवर स्वतः मार्ग काढण्याऐवजी तिने देवाचीच टेस्ट घेण्याचं ठरवलं आणि या जीवघेण्या प्रयोगाचा तिने आपल्या निरागस मुलीलाही भाग बनवलं. ओहयोच्या रस्त्यावर तिने कार भरधाव वेगात पळवली. तिनं ना रेड लाइटकडे लक्ष दिलं ना ट्रॅफिकची पर्वा केली. वाहतुकीचे सर्व नियम ती मोडत गेली. तिच्या कारमुळे दोन अपघातही झाले. दोन गाड्यांना तिची कार आदळली. शिवाय एका खांबालाही गाडीने टक्कर दिली. सुदैवाने कार भरधाव वेगात असताना कोणता मोठा अपघात झाला नाही. महिला आणि मुलीलाही गंभीर दुखापत झाली नाही. देव आपल्याला योग्य मार्ग दाखवेल असा तिला विश्वास होता. हे वाचा - मृत व्यक्तीच्या दात, केसांपासून ज्वेलरी; तरुणीला आगळेवेगळे दागिने बनवण्याची आवड घटनेच्या एक तासाभरापूर्वी तिने वाइन घेतली होती. पण घटनेवेळी तिच्या रक्तात अक्होहोल सापडलं नाही. याचा अर्थ गाडी चालवताना ती नशेत नव्हती. जेव्हा पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा तिनं आपण देवावरील आपला विश्वास तपासत होतो, असं स्पष्टपणे सांगितलं. तिचं हे कारण ऐकून पोलीसही हैराण झाले. तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
First published:

Tags: America, Viral

पुढील बातम्या