• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • बापरे बाप! ऑनलाईन गेममध्ये मुलानं उडवले 2 लाख रुपये, वडिलांपासून ‘अशी’ लपवली माहिती

बापरे बाप! ऑनलाईन गेममध्ये मुलानं उडवले 2 लाख रुपये, वडिलांपासून ‘अशी’ लपवली माहिती

ऑनलाईन गेम (Online Game) खेळताना एका मुलानं त्याच्या वडिलांच्या खात्यातून 2 लाखांपेक्षाही अधिक रुपये (More than 2 lakh) खर्च केले आणि ती माहिती वडिलांपासून लपवली.

 • Share this:
  लखनऊ, 15 जुलै : ऑनलाईन गेम (Online Game) खेळताना एका मुलानं त्याच्या वडिलांच्या खात्यातून 2 लाखांपेक्षाही अधिक रुपये (More than 2 lakh) खर्च केले आणि ती माहिती वडिलांपासून लपवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वडिलांसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून सायबर पोलीस (Cyber Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुलांना लागलेलं ऑनलाईन गेमचं (Online Game) वेड आणि त्यात शाळा बंद (Schools closed) असल्यामुळे अनेकजण अशा प्रकारे ऑनलाईन मनोरंजनासाठी (Online Entertainment) पैसे खर्च करत असल्याचं दिसून आलं आहे. मात्र गेम खेळता खेळता लाखो रुपये खर्च झाल्यामुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आलं आहे. नेमकं काय घडलं? उत्तर प्रदेशातील जालौन परिसरात राहणाऱा मुलगा पब्जी आणि फ्री-फायर हे ऑनलाईन गेम खेळत होता. या गेमसाठी वेगवेगळी डिजिटल वेपन्स विकत घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात. एकामागून एक ऑनलाईन वेपन्सची खरेदी तो करत गेला आणि वडिलांच्या बँक खात्यावरून पैसे डेबिट होत गेले. मोबाईल मुलाकडे असल्यामुळे बँकेचा मेसेज आल्याचं वडिलांना कळत नव्हतं. अशी लपवली चोरी दर वेळी ऑनलाईन पैसे भरल्यानंतर आलेला बँकेचा मेसेज हा मुलगा डीलिट करून टाकत होता. त्यामुळे आपल्या खात्यातून पैसे वजा होत आहेत, याची कुठलीच कल्पना वडिलांना आली नाही. त्याचप्रमाणं ग्राहकाकडून कुठलीही तक्रार न आल्यामुळं बँकेनं हे व्यवहार रोखण्याचादेखील काहीच प्रश्न नव्हता. सलग महिनाभर त्यानं अनेकदा अशा प्रकारे ऑनलाईन खरेदी केली आणि वडिलांपासून ही बाब लपवत राहिला. महिन्याच्या शेवटी जेव्हा बँकेचं स्टेटमेंट आलं, तेव्हा वडिलांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांना जबर धक्का बसला. हे वाचा -VIDEO - नवरीला पाहताच सुटला नवरदेवाच्या मनावरचा ताबा; स्टेजवरच ढासळला तोल आणि... सायबर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलं असलं, तरी प्रथमदर्शनी यामध्ये कुठलीही फसवणूक किंवा चोरी नसल्याचं दिसून येत आहे. मुलानेच ऑनलाईन खरेदी केली असल्यामुळे कंपनीकडून तो पैसा परत मिळण्याची शक्यता धूसर आहे. मात्र पालकांनी आपल्या मुलांच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीवर बारीक लक्ष ठेऊन असणं आणि मुलं मोबाईलवर नेमकं काय करतात, याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. मुलांना मोबाईलशिवाय इतर काही मनोरंजन देता येईल का, याचादेखील विचार करण्याची गरज आहे.
  Published by:desk news
  First published: