अनेकांना दागिन्यांची आवड असते. महिलांसह पुरुषांनाही दागिने आवडतात. काही लोकांना डायमंड, काहींना गोल्ड तर काहींना आणखी काही आवडतं. परंतु ऑस्ट्रेलियात एक तरुणी मृत लोकांच्या दातापासून ज्वेलरी तयार करुन त्याची विक्री करते. ही तरुणी तिच्या या गोष्टीमुळे इंटरनेटवर तुफान चर्चेत आहे. हीच तिची आवड असल्याचं त्या तरुणीचं म्हणणं आहे.