नवी दिल्ली, 19 मे: सरकारी बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी सध्या उपलब्ध झाली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) क्लार्क श्रेणीत पाच हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती (SBI Clerk Recruitment 2021) सुरू आहे. आता यासाठी अर्ज करण्याची मुदतही 17 मेवरून 20 मे 2021 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्यांनी अजून अर्ज केले नसतील त्यांना आणखी एक संधी आहे. स्टेट बँकेत ज्युनिअर असोसिएटस (Junior Associates) पदासाठी भरती प्रक्रिया सुरूअसून, इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर भेट देऊन त्वरित अर्ज करू शकतात.
ज्युनिअर असोसिएटस पदावर उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं पूर्व आणि मुख्य परीक्षा घेण्यात येईल. पूर्व परीक्षेचे कॉल लेटर 26 मे रोजी जारी केले जाईल आणि जूनमध्ये परीक्षा होईल.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी उत्पन्नाचा दाखला सादर करणं आवश्यक आहे. बँकेद्वारे निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला कळवले जाईल. अर्ज करताना उमेदवार जी प्रादेशिक भाषा निवडतील त्या भाषेमध्ये परीक्षेचे आयोजन केले जाईल. पूर्व परीक्षा 1 तासाची असेल. यामध्ये इंग्रजी भाषा, तार्किक क्षमता, गणितीय क्षमता यासंबंधी 100 गुणांसाठी 100 प्रश्न असतील. चुकीच्या उत्तरासाठी 0.25 म्हणजेच पाव गुण वजा केला जाईल. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल.
महत्त्वाच्या तारखा -
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात - 27 एप्रिल 2021
अंतिम मुदत - 20 मे 2021
शुल्क भरण्याची अंतिम तारीख - 20 मे 2021
वयोमर्यादा -
उमेदवाराचं वय किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षे असणं गरजेचे आहे.
पदं -
ज्युनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) आणि ज्युनियर असोसिएट्स (बॅकलॉग)
वेतन -
निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 11,765 रुपये ते 31,450 रुपये वेतन मिळेल.
पात्रता :
ज्युनिअर असोसिएटस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार भारत सरकार आणि राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असणं आवश्यक आहे.
अर्ज कुठे करायचा?
पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी sbi.co.in या वेबसाइटला भेट द्यावी. उमेदवारांनी स्टेट बँकेनं जारी केलेली अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, Sbi bank job, SBI Bank News