• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Sarkari Jobs: 9 हजाराहून अधिक जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

Sarkari Jobs: 9 हजाराहून अधिक जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

विविध सरकारी संस्था, विभाग आणि कंपन्यांमध्ये 9000 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या अंतिम तारखेआधी नोकरीसाठी (Government Jobs) अर्ज केल्यास तुम्हालाही सरकारी नोकरी करण्याची संधी मिळू शकते.

  • Share this:
नवी दिल्ली 17 मे: विविध सरकारी संस्था, विभाग आणि कंपन्यांमध्ये 9000 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या अंतिम तारखेआधी नोकरीसाठी अर्ज केल्यास तुम्हालाही सरकारी नोकरी करण्याची संधी मिळू शकते. जाणून घेऊया या नोकऱ्यांबद्दल. आम्ही इथे माहिती दिली असली तरीही संबंधित विभागाने अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं असतं, ते तपासूनच मग तुम्ही अर्ज करा. अर्ज व्यवस्थित पद्धतीने केला नसेल तर तो रद्द ठरवला जातो. Bihar GDS Recruitment 2021: भारतीय पोस्ट विभागाने (Indian Postal Department) बिहार सर्कलमधील 1940 डाक सेवकांच्या पदांसाठी www.appost.in या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2021 आहे. PSCB Recruitment 2021 : पंजाब स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने (Punjab State Cooperative Bank Limited)क्लार्कसहित इतर 856 पदांसाठी अधिकृत वेबसाइट pscb.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे. AIIMS Bhubaneswar Recruitment 2021: एम्स भुवनेश्वरने सीनियर रेजिडेंटच्या 90 पदांसाठी अधिकृत वेबसाइट aiimsbhubaneswar.nic.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2021आहे. Bihar MO Recruitment 2021: बिहार स्टेट हेल्थ सोसायटीने (Bihar State Health Society) मेडिकल ऑफिसरच्या 1000 पदांसाठी अधिकृत वेबसाइट statehealthsocietybihar.org वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. मुलाखत घेऊन इथं भरती केली जाणार आहे. मुलाखती 14, 17 आणि 21 मे 2021 ला होतील. BEL Trainee Engineer Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (Bharat Electronics Limited) ट्रेनी इंजीनियरच्या 30 पदांसाठी अधिकृत वेबसाइट www.bel-india.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2021 आहे. MCL Recruitment 2021: महानदी कोलफील्ड्स लिमिटेडने (Mahanadi Coalfields Limited) फार्मासिस्टसहित इतर 46 पदांसाठी अधिकृत वेबसाइट mahanadicoal.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे. CG Recruitment 2021: छत्तीसगड महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने सामाजिक सदस्यसहित इतर 36 पदांसाठी अधिकृत वेबसाइट cgwcd.gov.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021 आहे. JKSSB Recruitment 2021: जम्मू व कश्मीर सेवा चयन बोर्डाने विविध 2311 पदांच्या भरतीसाठी याआधी जाहीर केलेल्या अर्ज करण्याच्या तारखेला आठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट jkssb.nic.in वर दिलेल्या माहितीनुसार आता 20मे 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. याआधीची अंतिम तारीख 12 मे 2021 होती. AIIMS Gorakhpur Recruitment 2021: एम्स गोरखपुरने प्रोफेसरच्या 127 जागा भरण्यासाठी अधिकृत वेबसाइट aiimsgorakhpur.edu.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं असून इच्छुक 8जून 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. NHM MP CO Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य मिशन मध्य प्रदेशने (National Health Mission Madhya Pradesh)कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या (Community Health Officer) 2850 पदांच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाइट sams.co.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 31 मे 2021आहे. देशभरातील या सरकारी संस्थांमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांचं नोटिफिकेशन बारकाईने वाचा.
Published by:Kiran Pharate
First published: