मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

मंदीत संधी, Tech Sector मध्ये 4000 लोकांना नोकरी देणार ही कंपनी

मंदीत संधी, Tech Sector मध्ये 4000 लोकांना नोकरी देणार ही कंपनी

भारतीयांसाठी टेक सेक्टरमध्ये (Tech Sector) नोकरी करण्यासाठी मोठी संधी आहे.

भारतीयांसाठी टेक सेक्टरमध्ये (Tech Sector) नोकरी करण्यासाठी मोठी संधी आहे.

भारतीयांसाठी टेक सेक्टरमध्ये (Tech Sector) नोकरी करण्यासाठी मोठी संधी आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 13 मे: कोरोना काळात (Corona Pandemic) अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. नोकरी गेल्यानंतर अनेकांना आता दुसरा जॉब मिळवण्यासाठी अनेक समस्या येत असून, काही जण सॅलरी कटिंगच्या समस्येत आहेत. अशात भारतीयांसाठी टेक सेक्टरमध्ये (Tech Sector) नोकरी करण्यासाठी मोठी संधी आहे. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी असलेली जेपी मॉर्गन (JP Morgan) यावर्षी भारतात हजारो लोकांना नोकरी देण्याची योजना आखत आहे.

जेपी मॉर्गनने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी या वर्षात भारतात जवळपास 4000 एक्सपीरिअन्स टेक्नोलॉजिस्टला आपल्या सह जोडू इच्छित आहे. जेपी मॉर्गनमध्ये एचआर इंडिया कॉर्पोरेटेड सेक्टरचे हेड गौरव अहलूवालिया यांनी सांगितलं, की टेक्नोलॉजी आमच्या ग्राहकांच्या यशासाठी आणि बिजनेस स्ट्रेटेजीसाठी महत्त्वपूर्ण आहे. आम्ही ही कौशल्य विकसित करण्यास सतत तयार आहोत, ज्यात क्लाउड, बिग डेटा, आर्टिफिशियस इंटेलिजेन्स, मशीन लर्निंग, डिजीटल प्लॅटफॉर्म आणि सायबर स्पेससारखे सेक्टर सामिल आहेत.

(वाचा - Success Story: चहा विकून कोट्यधीश झाला 'हा' व्यक्ती, महिन्याला कमावतो 1.2 कोटी)

सध्या जागतिक स्तरावर न्यूयॉर्कस्थित जेपी मॉर्गनमध्ये 2.5 लाखांहून अधिक कर्मचारी असून यात 35000 हून अधिक कर्मचारी भारतात कार्यरत आहेत. हे कर्मचारी कंपनीच्या बंगळुरू, मुंबई आणि हैदराबादमध्ये सुरू असलेल्या टेक्नोलॉजी अँड ऑपरेशन्स सेंटरमध्ये काम करत आहेत.

(वाचा - सत्तरीतही आजीबाई झाल्या बिझनेसवुमेन; 77व्या वयात सुरू केलं स्वत:चं फूड स्टार्टअप)

बंगळुरू येथील टेक सेंटरमध्ये होणार भरती -

टाइम्स ऑफ इंडियाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीसाठी करण्यात येणारी भरती अधिकतर बंगळुरूच्या टेक सेंटरमध्ये होणार आहे. कंपनी भारतात 4000 अनुभवी टेक्नोलॉजिस्टची भरती करणार असल्याची माहिती आहे.

First published: