Home /News /career /

SBI Clerk Exam Preparation 2021: लिपिक पदाच्या परीक्षेसाठी अशी करा तयारी, पहिल्या प्रयत्नात मिळेल यश

SBI Clerk Exam Preparation 2021: लिपिक पदाच्या परीक्षेसाठी अशी करा तयारी, पहिल्या प्रयत्नात मिळेल यश

स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank of India) नुकतीच लिपिक (Clerk) पदाच्या 5000 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी भरतीची (Recruitment) घोषणा केली आहे. या पद भरतीसाठी जून महिन्यामध्ये प्राथमिक लेखी परीक्षा (Prelims) घेण्यात येणार आहे.

नवी दिल्ली, 11 मे: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank of India) नुकतीच लिपिक (Clerk) पदाच्या 5000 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी भरतीची (Recruitment) घोषणा केली आहे. बँकेनं याबाबतची जाहिरातही सर्वत्र जारी केली आहे. या पद भरतीसाठी जून महिन्यामध्ये प्राथमिक लेखी परीक्षा (Prelims) घेण्यात येणार आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी एक महिना बाकी आहे. तेव्हा चांगल्या सरकारी नोकरीची संधी देणाऱ्या या परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन... प्राथमिक परीक्षेत इंग्रजी भाषा (English Language), रिझनिंग क्षमता (Reasoning Ability) आणि क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टीट्यूडबाबत (Quantitative Aptitude) प्रश्न विचारले जातील, तर मुख्य परीक्षेत या विषयांसह सामान्य ज्ञानाचा देखील (General Knowledge) समावेश असेल. स्टेट बँक लिपिक प्राथमिक परीक्षा 2021 पॅटर्न - - या परीक्षेत एकूण तीन पेपर असतील. प्रत्येक पेपर सोडवण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. - इंग्रजी भाषेच्या पेपरमध्ये 30 प्रश्न आणि इतर पेपरमध्ये प्रत्येकी 35 प्रश्न विचारले जातील. - प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश म्हणजेच पाव गुण वजा केला जाईल. - एकूण 100 गुणांची परीक्षा असेल. 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवावे लागतील. - परीक्षेत इंग्रजी भाषा, न्युमरिकल अ‍ॅबिलिटी आणि रिझनिंग अ‍ॅबिलिटीचे पेपर असतील.

(वाचा - सॉफ्टवेअर इंजिनियरने सुरू केला भाजी विकण्याचा व्यवसाय,आता होतोय 10 लाख टर्नओव्हर)

अशी करा परीक्षेची तयारी - इंग्रजी भाषा - सर्व बँक भरती परीक्षांमध्ये इंग्रजी भाषा अनिवार्य विषय आहे. इंग्रजी भाषेचा पेपर प्रामुख्यानं व्याकरण आणि शब्दसंग्रहावर आधारित असेल. बँकेला उमेदवाराचं इंग्रजी व्याकरणाचं ज्ञान आणि लेखन कौशल्याची चाचणी घ्यायची असते. त्यामुळं या पेपरमध्ये व्याकरण आणि लिखाणावर भर असतो. यासाठी उमेदवारांनी इंग्रजी भाषेचं व्याकरण समजून घेण्यावर भर द्यावा. एखादं इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक घेऊन त्यातील एक-एक धड्याचा अभ्यास करावा आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं द्यावीत. आपला अभ्यास किती झाला आहे याची चाचणी घेण्याकरता सराव प्रश्नपत्रिका सोडवावी. न्युमरिकल अ‍ॅबिलिटी - रेशो म्हणजे गुणोत्तर, सर्ड्स आणि पॉवर्स, पर्सेंटेज यांच्या अभ्यासानं न्यूमेरिकल अ‍ॅबिलिटी पेपरची तयारी सुरू करा. प्रथम या सगळ्या संकल्पना स्पष्ट करून घ्या आणि नंतर त्यावरील सराव प्रश्न सोडवा. यानंतर नंबर सिरीजचा अभ्यास करा. एक ते 30 पर्यंतचे वर्ग आणि घन पाठ करणं आवश्यक असून, यामुळे यासंबधीचे प्रश्न वेगानं सोडवता येतील. दररोज एक धड्याचा अभ्यास करून त्यावरील चार-पाच प्रश्न सोडवा. याशिवाय डेटा इंटरप्रिटेशनमध्ये पाढे, बार ग्राफ, पाय चार्ट याचा सराव करा. दररोज एका भागाचा अभ्यास करून प्रश्न सोडवण्याची तयारी केल्यास वेळेत सगळा अभ्यास पूर्ण होईल.

(वाचा - मेकअपच्या हौसेसाठी स्थापन केली कंपनी, Corona काळात; लाखोंची उलाढाल)

रिझनिंग अ‍ॅबिलिटी - याची तयारी सुरू करण्याआधी या विभागातील अभ्यासक्रम आणि प्रश्नांची पद्धत समजून घ्या. यानंतर एक एक विषय घेऊन अभ्यासाला सुरुवात करा. एखादा धडा वाचून समजून घेतल्यावर त्यावर आधारित प्रश्न सोडवा. त्याच विषयावरील थोडे कठीण प्रश्नही सोडवण्याचा सराव करा. यामुळे त्या विषयावरील कोणतेही प्रश्न सहज सोडवता येतील. त्याचप्रमाणे, रिझनिंग अॅबिलिटी विषयातील सर्व प्रकरणांचा नीट अभ्यास करणं आवश्यक आहे. सगळा अभ्यास पूर्ण झाल्यावर संपूर्ण सराव परीक्षा होईपर्यंत नियमितपणे या सगळ्या विषयांचा सराव करत रहा.
First published:

Tags: Career, Sbi alert, Sbi bank job

पुढील बातम्या