SBI मध्ये 56 जागांवर व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

Jobs, Career, SBI - तुम्ही नोकरी शोधत असाल तर SBI मध्ये चांगली संधी आहे

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 03:08 PM IST

SBI मध्ये 56 जागांवर व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

मुंबई, 02 सप्टेंबर : स्टेट बँक ऑफ इंडियानं मेडिकल ऑफिसर (BMO - 2) पदासाठी 56 व्हेकन्सीज काढल्यात. योग्य उमेदवार या पदांसाठी 19 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. एकूण 56 व्हेकन्सी आहेत. त्यात 24 जागा आरक्षण नसलेल्या आहेत.

कुठल्या शहरात किती व्हेकन्सीज?

अमरावती - 3

अहमदाबाद - 3

पाटणा - 2

Loading...

बंगळुरू - 5

भोपाळ - 2

भुवनेश्वर - 3

चंदिगढ - 8

चेन्नई - 1

नवी दिल्ली - 2

'या' मुस्लीम देशाच्या नोटेवर विराजमान आहेत गणराया

हैद्राबाद - 5

जयपूर - 7

लखनौ - 7

उत्तर-पूर्व - 2

महाराष्ट्र - 4-4

तिरुवनंतपूरम - 5

या पदांसाठी पगार 31,705 रुपये ते 45,950 रुपयांपर्यंत असेल.

LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, 'हे' आहेत फायदे

शैक्षणिक पात्रता

बँक मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मेडिकल काॅन्सिल ऑफ इंडियाकडून मान्यता असलेल्या संस्थेची एमबीबीएस पदवी हवी. संबंधित क्षेत्रात 5 वर्षाचा अनुभव हवा. पीजी पदवी असलेल्यांकडे 3 वर्षाचा अनुभव हवा. इंडियन मेडिकल काॅन्सिल किंवा स्टेट मेडिकल काॅन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन हवं.

वय

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय जास्तीत जास्त 35 वर्षांचं हवं. 31 मार्च 2019पर्यंत 35 पूर्ण हवं. एससी आणि एसटी उमेदवाराला पाच आणि ओबीसीला 3 वर्षांची सवलत मिळेल. निवड इंटरव्ह्यूनंतरच होईल.

खूशखबर! पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल नाही, 'हे' आहेत आजचे दर

अर्जाची फी

उमेदवारांना 750 रुपये फी आहे. एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी 125 रुपये फी आहे. फी ऑनलाइन क्रेडिट, डेबिट आणि नेट बँकिंगद्वारे जमा करावी लागेल.

कसा कराल अर्ज?

www.sbi.co.in च्या होमपेजवर जाऊन क्लिक करा

नव्या वेबपेजवर SBI सेक्शनमध्ये करंट ओपनिंग्जवर क्लिक करा

आणखी एका नव्या वेबपेजवर दिलेल्या RECRUITMENT OF BANK MEDICAL OFFICER (BMO-II) वर क्लिक करा

वेबपेजवर येऊन अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा

फाॅर्म सबमिट केल्यानंतर प्रीव्ह्यूवर क्लिक करा. नंतर फायनल सबमिटवर क्लिक करा

पेमेंटवर क्लिक करून श्रेणीनुसार फी भरा. सबमिटवर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा

फाॅर्मची प्रिंट आऊट काढून ठेवा

पृथ्वीवर चालण्यासाठी घालावा लागला चक्क स्पेस सुट, VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: SBI
First Published: Sep 2, 2019 03:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...