LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, 'हे' आहेत फायदे

LIC New Policy - एलआयसीनं नवी पाॅलिसी लाँच केलीय. 18 वर्षापासून ती घेता येते. जाणून घ्या त्याबद्दल

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 12:33 PM IST

LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, 'हे' आहेत फायदे

मुंबई, 02 सप्टेंबर : भारतीय जीवन विमा (LIC)नं एक नवा टर्म इन्शुरन्स प्लॅन टेक टर्म लाँच केलाय. ही प्रोटेक्शन ऑनलाइन टर्म इन्शुरन्स पाॅलिसी आहे. ही पाॅलिसी पाॅलिसीधारकाच्या कुटुंबाला सुरक्षा देते. तुम्ही ही पाॅलिसी ऑनलाइन खरेदी करू शकता. टेक टर्म प्लॅनची विक्री 1 सप्टेंबर 2019पासून सुरू होणार आहे.

18 वर्षांचा तरुणही घेऊ शकतो हा प्लॅन

टेक टर्म प्लॅनचा नंबर आहे 854. UIN नंबर 512N333V01 आहे. LIC Tech Term प्लॅनची पाॅलिसी 10 वर्ष ते 40 वर्षापर्यंत सुरू राहू शकते. ग्राहक त्याच्या सोयीनुसार ती निवडू शकतात. या विमा प्लॅनला 18 वर्षापासून 65 वर्षापर्यंतचे लोक घेऊ शकतात. LIC च्या Tech Term मध्ये जास्तीत जास्त मॅच्युरिटी 80 वर्षाची ठेवलीय.

खूशखबर! पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल नाही, 'हे' आहेत आजचे दर

कमीत कमी इतक्या रुपयांचा घ्यावा लागणार प्लॅन

Loading...

Tech Term पाॅलिसीसाठी तुम्हाला कमीत कमी 50 लाख रुपयांचा सम अश्योर्डचा प्लॅन खरेदी करावा लागेल. जास्तीत जास्त सम अश्योर्डची काही मर्यादा नाही. विमाधारकाकडे प्रीमियम देण्यासाठी दोन पर्याय असतील. तो सहा महिन्यांनी किंवा वर्षाला प्रीमियम भरू शकतो.

तुळस फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच का वाहतात? वाचा काय आहे यामागची कथा

सिगारेट ओढणारा आणि न ओढणाऱ्यासाठी वेगवेगळा प्रीमियम

टेक टर्ममध्ये सिगारेट ओढणारा आणि न ओढणाऱ्यासाठी वेगवेगळा प्रीमियम असेल. जे सिगारेट ओढतात त्यांच्यासाठी जास्त प्रीमियम असेल. तर ओढत नसणाऱ्यांसाठी कमी प्रीमियम द्यावा लागेल. पुरुषांसाठी जास्त प्रीमियम आणि महिलांसाठी कमी प्रीमियम असेल.

क्लेमचे मिळतील पर्याय

क्लेमच्या वेळी पेमेंटसाठी 2 पर्याय असतील. विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला विम्याची रक्कम एकदम किंवा टप्प्यानं दिली जाईल. विमाधारकाला जिवंत असताना काही मिळणार नाही. कारण हा एक टर्म प्लॅन आहे.

दर महिन्याला कमाई हवी? मग 'अशी' करा गुंतवणूक

ऑनलाइनच मिळेल टर्म प्लॅन

टेक टर्म प्लॅन तुम्ही ऑफलाइन नाही तर फक्त ऑनलाइन घेऊ शकता. ऑनलाइन खरेदीसाठी तुम्हाला LIC च्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. www.licindia.in इथे क्लिक करा. या प्लॅनमध्ये सेक्शन 80सी प्रमाणे इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळत नाही.

या पाॅलिसीत कर्जाची सुविधा मिळणार नाही. ऑनलाइन पेमेंट नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारेच करावं लागेल.

Ganesh Chaturthi 2019: पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला भक्तांची अलोट गर्दी, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: LIC
First Published: Sep 2, 2019 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...