मुंबई, 02 सप्टेंबर : आज गणेशोत्सव. बाप्पा चांगली बातमी घेऊन आलाय. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत काही बदल झालेले नाहीत. गेले चार दिवस पेट्रोलचे भाव स्थिरच राहिलेत. डिझेलचे दरही चार दिवस बदललेले नाहीत. कच्च्या तेलाच्या भावात चढउतार झाल्यानं घरगुती बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिलेत. चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार सोमवारी दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर क्रमश: 72.01 रुपये, 77.67 रुपये, 74.67 रुपये आणि 74.80 रुपये प्रति लीटर आहेत. तर चार महानगरांमध्ये डिझेलचा दर क्रमश: 65.25 रुपये, 68.41 रुपये, 67.63 रुपये आणि 68.94 रुपये प्रति लीटर आहे. दर महिन्याला कमाई हवी? मग ‘अशी’ करा गुंतवणूक सकाळी 6 वाजता किंमतींमध्ये होतो बदल पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढ तसंच घट पाहायला मिळते. सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. PNB च्या FD व्याजात मोठे बदल, ‘हे’ आहेत नवे दर आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महागाईचे चटके, स्वयंपाकाचा गॅस ‘इतका’ झाला महाग कंपनी आणि क्रमांकाची सुविधा इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122 या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील. Ganesh Chaturthi 2019: सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे रंगले बाप्पाच्या स्वागतात, पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.