जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 'या' मुस्लीम देशाच्या नोटेवर विराजमान आहेत गणराया

'या' मुस्लीम देशाच्या नोटेवर विराजमान आहेत गणराया

'या' मुस्लीम देशाच्या नोटेवर विराजमान आहेत गणराया

Ganesh, Note - एका देशाच्या नोटेवर गणपतीचं चित्र आहे. या मुस्लीम देशात हिंदू देवदेवतांचे फोटो पाहायला मिळतात

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 सप्टेंबर : आज गणेश चतुर्थी. गणेशोत्सव सगळीकडे मोठ्या उत्साहात सुरू आहे. गणपतीचा फोटो किंवा चित्र कधी कुठल्या नोटेवर आपण पाहिलेलं नाहीय. पण तुम्हाला हे माहीत आहे का की एका देशाच्या नोटेवर गणेशाचं चित्र आहे. महत्त्वाचं म्हणजे तो मुस्लीम देश आहे. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणजे इंडोनेशिया. या देशाच्या नोटेवर गणपतीचं चित्र आहे. इथली करन्सी भारतासारखीच आहे. इथे रुपया चालतो. इंडोनेशियात जवळजवळ 87.5 टक्के लोकसंख्या इस्लाम धर्म मानते. तिथे हिंदू लोकसंख्या 3 टक्केच आहे. तिथल्या 20 हजाराच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. इंडोनेशियात गणपतीला शिक्षण, कला आणि विज्ञान याचा देव मानलं जातं. LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, ‘हे’ आहेत फायदे नोटेत काय आहे खास? इंडोनेशियात 20 हजाराच्या नोटेवर समोर गणपतीचा फोटो आहे आणि मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे. त्यात शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. या नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. देवांत्रा हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नायक आहेत. हेही आहे कारण असं म्हणतात काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. त्यावेळी सरकारनं 20 हजार रुपयांची नोट छापली. त्यावर गणपती होता. नंतर अर्थव्यवस्था सुधारली. म्हणून लोकांची गणपतीवर श्रद्धा बसली. खूशखबर! पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल नाही, ‘हे’ आहेत आजचे दर मध्य रेल्वेत शिक्षक पदांची भरती, ‘असा’ करा अर्ज अर्जुन आणि कृष्णाचीही मूर्ती इंडोनेशियात लष्कराचा मॅस्काॅट हनुमान आहे. त्यांच्या प्रसिद्ध पर्यटक स्थळालर कृष्ण आणि अर्जुनची मूर्ती आहे. सोबत भीमाचा पुत्र घटोत्कचही दिसतोय. Ganesh Chaturthi 2019: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिद्धिविनायकाच्या चरणी, पाहा LIVE VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात