मुंबई, 10 जानेवारी : भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI)काम करायचं असेल तर एक चांगली संधी आहे. रिझर्व्ह बँकेने 926 सहाय्यक पदांसाठी अर्ज मागितले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू झालीय. ती 16 जानेवारीपर्यंत चालेल. या पदांवर नियुक्ती होण्यासाठी अर्जदाराला प्रिलिमिनरी आणि मेन परीक्षा पास करावी लागेल. मेन परीक्षा 2020 मध्ये आयोजित केली जाईल. या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल. RBI साठी पदांची संख्या - 926 या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर इच्छुक उमेदवारांचं वय कमीत कमी 20 वर्षं आणि जास्तीत जास्त 28 वर्ष असायला हवं. शैक्षणिक पात्रता या नोकरीसाठी अर्जदाराकडे कोणत्याही विषयाची पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कमीत कमी 50 टक्के गुण हवेत.अर्जदाराला कॉम्प्युटरवर वर्ड प्रोसेसिंग करण्याचं ज्ञान हवं. जे लोक एखाद्या ठराविक पदासाठी अर्ज करत असतील तर त्यांना त्या राज्याची भाषा समजणं आवश्यक आहे.
(हेही वाचा : घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर ! मोदी सरकार करू शकतं या करांमध्ये कपात)
असा करा अर्ज अर्जदाराला सगळ्यात आधी RBI ची अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जावं लागेल. इथे opportunities@RBI ऑप्शन वर क्लिक करावं लागेल. यानंतर RBI Assistant लिंक वर क्लिक करा. सहाय्यक पदासाठी नियुक्त झालेल्या व्यक्तीला दर महिन्याला 36 हजार 91 रुपये पगार असेल. याशिवाय जादा भत्तेही मिळतील. अर्जदाराला अॅप्लिकेशन फी म्हणून 450 रुपये द्यावे लागतील. याशिवाय अनुसूचित जाती-जमातींसाठी 50 रुपयेच फी आहे. (हेही वाचा : EPFO ने सुरू केली नवी सेवा, तुमच्या PF च्या तक्रारी सोडवणार) =====================================================================================