मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPFO ने सुरू केली नवी सेवा, तुमच्या PF च्या तक्रारी सोडवणार

EPFO ने सुरू केली नवी सेवा, तुमच्या PF च्या तक्रारी सोडवणार

एम्लॉयी प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच EPFO ने खातेधारकांसाठी एक नवी सेवा सुरू केली आहे. EPFO तर्फे 135 विभागीय कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या 10 तारखेला 'निधि आपके निकट' हा उपक्रम चालवला जात आहे.

    नवी दिल्ली, 10 जानेवारी : एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच EPFO ने खातेधारकांसाठी एक नवी सेवा सुरू केली आहे. EPFO तर्फे 135 विभागीय कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या 10 तारखेला 'निधि आपके निकट' हा उपक्रम चालवला जात आहे. तुम्ही EFPO मध्ये जाऊन PF च्या समस्या सोडवू शकता. EPFO ने आपल्या Twitter अकाउंट वर ही माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठीच ही योजना सुरू करण्यात आलीय. PF बद्दलच्या तक्रारी लवकर मिटाव्यात हा यामागचा उद्देश आहे. एखाद्याच्या तक्रारींवर त्याच दिवशी मार्ग निघाला नाही तर त्या सदस्याचा अर्ज ब्रँच ऑफिसरकडे दिला जाईल आणि महिन्याच्या 25 तारखेपर्यंत त्याचं निवारण केलं जाईल. #EPFO conducts an interactive session called"#NidhiApkeNikat" on 10th of every month(on next working day in case of holiday)in all field offices to discuss your doubts and provide your feedback Find the venue of #NidhiApkeNikat near you through #UmangApp as well as EPFO website pic.twitter.com/yVsLiTLhQX — EPFO (@socialepfo) January 8, 2020 प्रॉव्हिडंट फंडबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या उपक्रमाचा लाभ घेऊ शकता. (हेही वाचा : ICICI बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर यांना ED चा दणका, 78 कोटींची संपत्ती जप्त) PF चं व्यवस्थापन प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेचं व्यवस्थापन करणारी यंत्रणा 1 एप्रिल 2015 ला बनवण्यात आली होती. यानुसार EPFO च्या निधीपैकी 50 टक्के निधी हा सरकारी सुरक्षेमध्ये गुंतवता येतो. उरलेला 45 टक्के निधी कर्ज सुरक्षेत आणि 5 टक्के निधी शेअर्समध्ये गुंतवता येतो. सरकारी सुरक्षा आणि डेट बाँड्सवर दरवर्षी 7 टक्के रिटर्न मिळतो. शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर 16 टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न्स मिळतात. =======================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: EPF, Money

    पुढील बातम्या