घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर! मोदी सरकार करू शकतं या करांमध्ये कपात

घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर! मोदी सरकार करू शकतं या करांमध्ये कपात

मोदी सरकार 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामध्ये घर भाड्याने घेण्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काही करांमध्ये कपात करण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जानेवारी : मोदी सरकार 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामध्ये घर भाड्याने घेण्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काही करांमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर CNBC आवाज ला मिळालेल्या एक्स्क्लुझिव्ह माहितीनुसार परवडणाऱ्या घरांसाठी काही अटी शिथिल केल्या जाऊ शकतात. हा अर्थसंकल्प गृहनिर्माण क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल, अशी शक्यता आहे. रेंटल हाउसिंग म्हणजे भाड्याने घर घेण्यासाठी या अर्थसंकल्पात काही सवलती अपेक्षित आहेत. रेंटल हाउसिंगसाठी पायाभूत संरचनेचा दर्जा मिळणं शक्य आहे.

काय होणार फायदा?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरचनेचा दर्जा मिळाला की स्वस्त कर्ज मिळेल. मध्यम स्वरूपाच्या घरांच्या भाड्यावरचा कर कमी केला जाऊ शकतो. फक्त भाड्याच्या उद्देशाने बनवल्या जाणाऱ्या गृहप्रकल्पावर कॅपिटल गेन्स टॅक्सची सूट मिळू शकते. रेंटल प्रोजेक्टसाठी परदेशी गुंतवणूक म्हणजेच FDI च्या अटींमध्येही सवलत मिळू शकते. इनकम टॅक्स अॅक्टच्या 80 IBA नुसार टॅक्समधली सवलत वाढवली जाऊ शकते.सेक्शन 80 IBA नुसार अफोर्डेबल हाउसिंगची किंमत आणि आकार वाढवला जाऊ शकतो.

LIC ची जीवन प्रगती योजना, रोज खर्च करा 200 रुपये आणि मिळतील 28 लाख

2022 पर्यंत सगळ्यांसाठी घराची योजना

केंद्र सरकारने 2022 पर्यंत सगळ्यांसाठी घर देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. यासाठी सरकारी कंपनी NBCC ला लँड मॅनेजमेंट एजन्सी बनवलं जाईल. NBCC PSU जमिनीची विक्री करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहनिर्माण मंत्रालयाने अर्थसंकल्पाबाबत अर्थमंत्रालयाला काही शिफारसी पाठवल्या आहेत. अर्थमंत्रालय याबदद्ल गांभिर्याने विचार करतंय. त्यामुळे अर्थसंकल्पात गृहनिर्माण क्षेत्राबद्दल काय घोषणा होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

KYC करण्यासाठी आता जावं लागणार नाही बँकेत, RBI ने बदलला सगळ्यात मोठा नियम

===================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: January 10, 2020, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading