मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

PM Rojgar Mela 2022: आता बेरोजगारी होणार दूर; तब्बल 10 लाख जॉब्ससाठी अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन

PM Rojgar Mela 2022: आता बेरोजगारी होणार दूर; तब्बल 10 लाख जॉब्ससाठी अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन

येत्या 18 महिन्यांत 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

येत्या 18 महिन्यांत 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

PM Rojgar Mela 2022: येत्या 18 महिन्यांत 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 29 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 ऑक्टोबर रोजी पीएम रोजगार मेळा सुरू केला होता. याद्वारे केंद्र सरकारच्या विविध सरकारी विभागांमध्ये 10 लाख भरती होणार आहे. पंतप्रधान मोदींनी 75000 तरुणांना नियुक्तीपत्रे देऊन त्याची सुरुवात केली. यानंतर, यापूर्वी सीआयएसएफसह इतर अनेक विभागांमध्ये भरती झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. येत्या 18 महिन्यांत 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

देशात बेरोजगार तरुणांची संख्या वाढत चालली असताना केंद्र सरकारनं हे बेरोजगारी कमी करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. मात्र या रोजगार मेळाव्यासाठी नक्की पात्रता काय आहे? आणि रजिस्ट्रेशन कसं करणार यावर अनेकांमध्ये संभ्रम आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यासाठी काय पात्रता आहे आन रजिस्ट्रेशन कसं करावं हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Maharashtra Police Bharti: फक्त नशिबाच्या जोरावर नोकरी मिळत नसते गड्यांनो; जॉबसाठी ही IMP पुस्तकं येतील कामी

जून 2022 मध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्याबाबत पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम सर्व मंत्रालये आणि विभागांना सूचना दिल्या. रोजगार मेळाव्याद्वारे 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये भरती केली जात आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, प्राप्तिकर विभागासह विविध विभागांमध्ये ही भरती सुरू आहे.

अहवालानुसार, केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 2023 च्या अखेरीस गट अ श्रेणीतील एकूण 2386, गट ब मधील 25836 आणि गट क मधील 7.6 लाख रिक्त जागा भरल्या जातील. विविध शासकीय विभागांतर्गत एकूण 10 लाख पदे एकत्रितपणे भरण्यात येणार आहेत.

आहात कुठे? ग्रॅज्युएशन झालंय ना? मग महिन्याला मिळेल 1,30,000 रुपये सॅलरी; ESIC मध्ये थेट नोकरी

पंतप्रधान रोजगार मेळाव्यासाठी अर्ज कसा करावा?

पीएम रोजगार मेळ्याची माहिती यूपीएससी, एसएससी इत्यादी विविध भरती मंडळांवर उपलब्ध असेल.

पीएम रोजगार मेळा 2022 ची लिंक भर्ती बोर्डाच्या वेबसाइटवर आढळेल.

पीएम एम्प्लॉयमेंट फेअर 2022 च्या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागेल.

MPSC Recruitment: थेट अधिकारी होण्याची संधी सोडू नका; तब्बल 623 जागांसाठी अवघे दोन दिवस शिल्लक

पंतप्रधान रोजगार मेळ्यासाठी कोण अर्ज करू शकतो?

पंतप्रधान रोजगार मेळ्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 29 वर्षे असावे.

उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

उमेदवारास संबंधित विषयात बॅचलर डिग्री / 10वी, 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवारांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Employment, Job alert, Jobs Exams, PM, Pm modi