मुंबई, 27 नोव्हेंबर: राज्यात नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.पोलीस होऊ इच्छिणारे सर्व तरुण तरुणी आता अभ्यासाला लागले आहेत. मात्र या परीक्षेचा अभ्यास नक्की कसा करावा आणि कुठून करावा? याबाबत अनेकांना प्रश्न पडले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी कामी येणाऱ्या पुस्तकांची यादी देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. महाराष्ट्र पोलीस भरती साठी गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी असे अनेक विषय आहेत. या प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र पुस्तकं आहेत. या पुस्तकांमधून अभ्यास करून तुम्हीही ही परीक्षा सहजपणे क्रॅक करू शकता. जाणून घेऊया विषयांनुसार पुस्तकांची यादी. Maharashtra Police Bharti: फक्त डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून रिजेक्ट होणं परवडणार नाही गड्यांनो; आताच रेडी ठेवा ही लिस्ट बौद्धिक चाचणी विषयासाठी IMP पुस्तकांची यादी
पुस्तकाचे नाव | लेखक |
---|---|
Fast Track बुद्धिमत्ता | सतीस वसे |
बुद्धिमता चाचणी | अनिल अंकलगी |
बुद्धिमत्ता चाचणी | नितीन महाले |
गणित विषयासाठी IMP पुस्तकांची यादी
पुस्तकाचे नाव | लेखक |
---|---|
संपूर्ण गणित | पंढरीनाथ राणे |
Fastrack Maths | सतीश वसे |
5 ते 8 क्रमिक पुस्तके | महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ |
मराठी आणि मराठी व्याकरण विषयासाठी IMP पुस्तकांची यादी
पुस्तकाचे नाव | लेखक |
---|---|
सुगम मराठी व्याकरण | मो. रा.वाळंबे |
संपूर्ण मराठी व्याकरण | बाळासाहेब शिंदे |
सामान्य ज्ञान विषयासाठी IMP पुस्तकांची यादी
पुस्तकाचे नाव | लेखक |
---|---|
सामान्य ज्ञान ठोकला | एकनाथ पाटील (तात्या) |
कलाशाखा घटक | के’ सागर पब्लिकेशन |
करंट अफेअर्ससाठी IMP पुस्तकांची यादी
पुस्तकाचे नाव | लेखक |
---|---|
न्यूज 18 लोकमत वेबसाईट | - |
सिम्प्लीफाईड Year Book | दिव्या महाले व बालाजी सुरणे |
चालू घडामोडी | देवा जाधवर |
Maharashtra Police Bharti: 90 मिनिटांत ठरणार तरुणांचं भविष्य; 18,000 पदांसाठी असं असेल परीक्षेचं पॅटर्न या पुस्तकाच्या मदतीनं तुम्ही नक्कीच महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा क्रककारु शकाल. अर्थात यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. तसंच स्वतःवर विश्वास असणं आवश्यक असणार आहे.