Home /News /career /

MSBSHSE SSC Result: Best of 5 मध्ये भूगोल ठेवता येणार का? बोर्डाच्या अध्यक्षांनी दिलं उत्तर

MSBSHSE SSC Result: Best of 5 मध्ये भूगोल ठेवता येणार का? बोर्डाच्या अध्यक्षांनी दिलं उत्तर

Maharashtra Board SSC Result 2020: या वर्षी एका विषयाची परीक्षा न घेताच निकाल लावण्यात आला. पण त्या भूगोलाच्या पेपरला सरासरी गुण देण्यात आले आहेत.

  पुणे, 29 जुलै : यंदाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board SSC result) सर्व दृष्टीने ऐतिहासिक ठरला. Covid च्या परिस्थितीमुळे निकाल लावायला विलंब झाला. या वर्षी एका विषयाची परीक्षा न घेताच निकाल लावण्यात आला. पण त्या भूगोलाच्या पेपरला सरासरी गुण देण्यात आले आहेत. आता सर्वोत्तम 5 (Best of 5)विषयांच्या मार्कांच्या यादीत भूगोलाचा समावेश विद्यार्थी करू शकतात का हा प्रश्न होता. त्यावर बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी खुलासा केला आहे. शकुंतला काळे म्हणाल्या, "निकाल लावताना इतर विषयांच्या मार्कांची सरासरी काढून भूगोलचे गुण दिले आहे. कारण यंदा कोविड लॉकडाऊनमुळे भूगोलचा रद्द झाला होता. या विषयाचे गुण बेस्ट ऑफ 5 मध्ये गृहित धरता येतील." दहावीची परीक्षा सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. हा online निकाल 1 वाजता पाहता येणार आहे. News18lokmat.com वरही निकाल पाहता येईल. वाचा-वाह! यंदाही मुलांपेक्षा मुलीच हुश्शार, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त
  वाचा-SSC Class 10th Result 2020: दहावीच्या निकालासंदर्भात 10 महत्त्वाच्या गोष्टी कसा पाहायचा निकाल न्यूज 18 लोकमतवर निकाल पाहणार असाल तर इथे आपल्याला दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाई नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. वाचा-SSC Result 2020: दहावीचा निकाल 95.30 टक्के, पुन्हा एकदा मुलींची बाजी (SSC Result 2020) दहावीचा निकाल उशिरानं जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागल्याती माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: SSC, Ssc board, Ssc-result

  पुढील बातम्या