मुंबई, 29 जुलै: महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल आज आहे. आज बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दुपारी 1 वाजता हा निकाल mahresult.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. याशिवाय News18 Lokmat वरही निकाल पाहता येणार आहे.
या परीक्षेला एकूण 15 लाख विद्यार्थी बसले होते.यंदाचा निकाल 95.30 टक्के लागला असून गेल्या अनेक वर्षांमधला हा सर्वाधिक निकाल असल्याचं सांगितलं जात आहे.
इथे पाहा दहावीचा निकाल
1. दहावीचा निकाल न्यूज 18 लोकमतसह mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, maharashtraeducation.com, mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
2. यंदा 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.
3. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जर गुणपडताळणी करायची असेल तर त्यासाठी 30 जुलै 2020 ते शनिवार 8 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
हे वाचा-SSC Result 2020: दहावीचा निकाल 95.30 टक्के, पुन्हा एकदा मुलींची बाजी
4. दहावीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. कोरोनामुळे 23 मार्चचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे.
5. 60 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक आहे.
6. दरवर्षीप्रमाणे यंदाही यंदाही मुलीच हुशार, मुलांपेक्षा 3 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त
7. 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्यांची संख्या अधिक आहे.
8. राज्यातील 8360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे आणि यंदा मुलींचा सर्वाधिक म्हणजे 96 टक्के निकाल लागला आहे.
9. छायाप्रतीसाठी गुरुवार 30 जुलै 2020 ते मंगळवार 18 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल.
10. मागच्या काही वर्षांपेक्षा यावर्षीचा निकाल सर्वाधिक असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.