मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MSBSHSE SSC Result: वाह! यंदाही मुलांपेक्षा मुलीच हुश्शार, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त

MSBSHSE SSC Result: वाह! यंदाही मुलांपेक्षा मुलीच हुश्शार, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त

अशातच झोमॅटोसारख्या प्रसिद्ध कंपनीने अत्यंत स्तूत्य निर्णय घेतला असून याची मोठी चर्चा सुरू आहे.  

अशातच झोमॅटोसारख्या प्रसिद्ध कंपनीने अत्यंत स्तूत्य निर्णय घेतला असून याची मोठी चर्चा सुरू आहे.  

यंदा राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागल्याती माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. मुख्य म्हणजे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

    मुंबई, 29 जुलै : कोरोनामुळे यंदाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC Result 2020) दहावीचा निकाल उशिरानं जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागल्याती माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. मुख्य म्हणजे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची निकाल सर्वात जास्त लागला आहे. तर, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागला आहे. कोरोनामुळे यंदा दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यंदा एकूण 15 लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात मुलींचा निकाल 96.91% लागला असून मुलांचा निकाल 93.99% लागला आहे. तर, विभागवारीनुसार कोकण विभागाचा 98.77 टक्क्यांसह सर्वात जास्त लागला आहे. तर, त्यानंतर कोल्हापूरचा 97.64 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा निकाल लागला आहे. तर, पुण्याचा 97.34 आणि मुंबईचा 96.72 % लागला आहे. वाचा-SSC Class 10th Result 2020: दहावीच्या निकालासंदर्भात 10 महत्त्वाच्या गोष्टी
    वाचा-SSC Result 2020: दहावीचा निकाल 95.30 टक्के, पुन्हा एकदा मुलींची बाजी कसा पाहायचा निकाल News18 Lokmat वर जर विद्यार्थी निकाल पाहणार असतील तर त्यांना सर्वप्रथम दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाई नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. SMS द्वारेही पाहता येणार निकाल- आपण बोर्डाकडे रजिस्टर केलेल्या मोबाईलनंबरवरून आपला निकाल SMS द्वारे पाहू शकणार आहात. इतर संकेतस्थळांवर mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Ssc board

    पुढील बातम्या