मुंबई, 29 जुलै: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल जाहीर झाला आहे. साधारण राज्यातील 17 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.
3 मार्च 2020 ते 23 मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. याशिवाय News18 Lokmatवरही आपण हा निकाल पाहू शकणर आहात. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाल्यानं निकालास विलंब झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
दहावीचा निकाल इथे पाहा...
कसा पाहायचा निकाल
News18 Lokmat वर जर विद्यार्थी निकाल पाहणार असतील तर त्यांना सर्वप्रथम दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाई नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.
SMS द्वारेही पाहता येणार निकाल- आपण बोर्डाकडे रजिस्टर केलेल्या मोबाईलनंबरवरून आपला निकाल SMS द्वारे पाहू शकणार आहात.
इतर संकेतस्थळांवर mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.