मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

विद्यार्थ्यांनो, Google मध्ये इंटर्नशिप करायची आहे? मग फॉलो करा या टिप्स आणि व्हा यशस्वी

विद्यार्थ्यांनो, Google मध्ये इंटर्नशिप करायची आहे? मग फॉलो करा या टिप्स आणि व्हा यशस्वी

तुमच्यात जिद्द असेल तर या टिप्स फॉलो करून तुम्ही google च काय कुठल्याही कंपनीत इंटर्नशिप मिळवू शकता.

तुमच्यात जिद्द असेल तर या टिप्स फॉलो करून तुम्ही google च काय कुठल्याही कंपनीत इंटर्नशिप मिळवू शकता.

तुमच्यात जिद्द असेल तर या टिप्स फॉलो करून तुम्ही google च काय कुठल्याही कंपनीत इंटर्नशिप मिळवू शकता.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 01 जुलै: शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकालाच जॉब हवा असतो. मात्र आजकालच्या काळात जॉब (Latest Jobs) मिळवणं इतकं सोपी राहिलं नाही. त्यात तुम्हाला चांगल्या कंपनीत भरघोस पगाराचा जॉब हवा असेल तर फ्रेशर्स (Freshers Jobs) म्हणून हे कठीणच आहे. जॉब मिळवण्यासाठी शिक्षण पूर्ण झाल्यावर काही दिवस इंटर्नशिप (Internship) करणं आवश्यक आहे.अनेकांना ही इंटर्नशिप google (Internship in Google) किंवा मायक्रोसॉफ्ट (Internship in Microsoft) सारख्या मोठ्या कंपनीत करायची इच्छा असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला Google मध्ये इंटर्नशिप (Internship in Google) कशी मिळणार याबाबत काही टिप्स सांगणार आहोत. तुमच्यात जिद्द असेल तर या टिप्स फॉलो करून तुम्ही google च काय कुठल्याही कंपनीत इंटर्नशिप मिळवू शकता.

कोणाला मिळेल इंटर्नशिप?

साधारणतः Google कम्प्युटर सायन्स (Computer Science) किंवा प्रोडक्ट मॅनेजमेंटमध्ये (Product Management) ग्रॅज्युएशन करणाऱ्या, PHD करणाऱ्या किंवा कोडिंगबाबत (Coding) असामान्य ज्ञान असणाऱ्या तरुणांना इंटर्नशिप ऑफर करतं. तसंच थर्ड इयर किंवा फायनल इअरला असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गुगल इंटर्नशिप देतं. तसंच MBA झालेल्या विद्यार्थ्यानाही गुगलमध्ये इंटर्नशिप मिळू शकते.

हे वाचा - Career: महिलांनो, फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचंय? 'हे' आहेत टॉप कॉलेजेस

इंटर्नशिपसाठी असं करा अप्लाय

पोर्टलवर करा अप्लाय

तुम्ही थेट गुगलच्या इंटर्नशिप पोर्टलवर (Google internship portal) जाऊन अप्लाय करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा अपडेटेड Resume आणि ट्रान्सक्रिप्टची गरज पडेल.

HR ला करा मेल

आधीच्या इंटर्नकडून किंवा गूगलशी संबंधित व्यक्तीकडून गूगल HR चा ईमेल आयडी (Email ID) मिळवा. यानंतर HR मेल करून तुमचा Resume त्यात जोडा. तसंच तुमचा अनुभव आणि तुमचे गोल्सही लिहायला विसरू नका.

ओळख महत्त्वाची

तुमचे कोणी मित्र, नातेवाईक किंवा अगदी कोणी दूरचे लोकं गुगलमध्ये असतील तर त्यांच्या संपर्कात राहून आणि त्यांचा रेफरन्स देऊन तुम्ही गुगलमध्ये इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकता. अशा लोकांच्या मदतीनं तुम्ही संपूर्ण प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ शकता.

सोशल मीडिया प्रोफाईल्स ठेवा प्रोफेशनल

गूगल सारख्या कंपन्या आपल्या उमेदवाराबद्दल खूप संशोधन करतात. म्हणूनच आपल्या सोशल मीडिया प्रोफाइल (Social Media Profile) व्यवस्थित आणि प्रोफेशनल ठेवणं आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला इंटर्नशिप मिळण्याची शक्यता वाढते.

First published:

Tags: Google