मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

MPSC Special: कोरोनानं आई-वडिलांचं निधन त्यात तहसीलदारपदी नियुक्ती नाही; आता जगायचं कशासाठी? सोनालीचा सवाल

MPSC Special: कोरोनानं आई-वडिलांचं निधन त्यात तहसीलदारपदी नियुक्ती नाही; आता जगायचं कशासाठी? सोनालीचा सवाल

संघर्ष आणि कहाणी वाचून डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

संघर्ष आणि कहाणी वाचून डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

संघर्ष आणि कहाणी वाचून डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

मुंबई, 06 जुलै: पुण्यातील स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar death) या MPSC च्या विद्यार्थ्यानं बेरोजगारीला (Unemployment) कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला. स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या व्यथा जगासमोर आल्या. पण राज्यात स्वप्नील सारखेच असे अनेक होतकरू विद्यार्थी आहेत जे MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरीच्या प्रतीक्षेत (No Job after MPSC) आहेत. अशाच काही विद्यार्थ्यांच म्हणणं आपण या सिरिजमधून जाणून घेणार आहोत. या सिरीजचा हा दुसरा भाग आहे.

लहानपणापासूनच अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या एका खंबीर रणरागिणीची व्यथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिचा संघर्ष आणि कहाणी वाचून डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.  MPSC ची मुख्य परीक्षा तब्बल सहा वेळा दिली आणि तीन वेळा मुखाखती दिल्या. तिसऱ्या मुलाखतीत नायब तहसीलदार म्हणून निवड झाली मात्र वर्ष उलटूनही नियुक्ती मिळाली नाही. ही व्यथा आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सोनाली भाजीभाकरेची.

लहानपणापासूनच अधिकारी (Dream becoming Officer) बनण्याचं स्वप्न उपाशी बाळगलेल्या सोनालीनं (Sonali Bhajibhakre) मोठ्या जिद्दीनं दहावी आणि बारावीत प्रथम क्रमांक पटकवला. मात्र मुलगी असल्यामुळे घरच्यांचा आणि नातेवाईकांचा सतत पुढील शिक्षणासाठी विरोध होता. त्यात लग्नाच्याही गोष्टी होऊ लागल्या. मात्र या सर्व गोष्टींना तोंड देत तिनं MPSC ची तयारी (MPSC Preperation) सुरु केली. एक नव्हे दोन नव्हे तब्बल सहा वेळा मुख्य परीक्षा (MPSC Mains) दिली. मुलीची प्रगती बघून आता आई-वडिलांनीही तिला पाठिंबा देण्यास सुरुवात केली.

हे वाचा -शाळेतून हाकललेला मुलगा झाला IPS ऑफिसर; अपयशानंतर असं केलं टार्गेट पूर्ण

2019 मध्ये झालेल्या MPSC परीक्षेत मुख्य परीक्षा पास करून सोनालीनं मुलाखत (MPSC Interview) दिली आणि 2020 तिची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली. सोनालीच्या बाबांनी आपल्या मुलींसाठी बघितलेलं स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. नायब तहसीलदार (Tehsildar) म्हणून निवड झाल्याच्या काही दिवसातच सोनालीच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलं. ज्या वडिलांनी मुलींसाठी मोठी स्वप्नं बघितली ते या जगात नाही म्हंटल्यावर कोणीही खचेल. मात्र सोनालीनं धीर सोडला नाही. आज ना उद्या नियुक्ती होऊन आपण अधिकारी होऊ या आशेवर ती होती.

त्यात 2021 च्या सुरुवातीला पुन्हा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे सोनालीला निवड होऊनही नियुक्ती मिळू शकली नव्हती. मात्र नियतीनं सोनालीच्या पुढ्यात दुःखाचा डोंगर रचला होता. एप्रिलमध्ये कोरोनानं सोनालीच्या आईचं आणि भावाचं निधन झालं. नोकरी नाही त्यात आई-वडील आणि भावाच्या जाण्यानं सोनाली खचली मात्र तिनं जिद्द सोडली नाही. आज वर्ष लोटूनही सोनालीला नियुक्ती मिळालेली नाही. सोनालीनं काही महिने MPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं मात्र तिनं आता ते काम सोडलं आहे.

"दुसऱ्या मुलाखतीच्या दिवशी माझी कॅटेगरी SBC आहे मात्र मी Open Girls कोट्यातून फॉर्म कसा काय भरला? हा प्रश्न मला विचारण्यात आला. माझ्याकडून जबरजस्ती याबाबदल लिहून घेण्यात आलं. त्यानंतर मला मुलाखतीसाठी पाठवण्यात आलं. आधीच असलेला मानसिक तणाव आणि या सर्व प्रकारामुळे मी अवघ्या दोन गुणांनी मुलाखत पास करू शकले नाही." असं सोनाली म्हणते.

"माझ्या आई-बाबांनी माझ्यासाठी खूप स्वप्न बघितली होती, माझ्याकडून त्यांच्या अपेक्षाही होत्या, मी त्या अपेक्षांवर खरी उतरली, मात्र माझ्या जीवा भावाच्या माणसांची साथ आज नाही. आई-वडिलांचं छत्र नाही. त्यात नोकरी नसल्यामुळे निराशा आहे" असंही सोनालीनं म्हंटलं आहे.

शासन आमच्याकडे कधी लक्ष देणार

" काल विधानसभेत MPSC च्या रिक्त जागा लवकरच भरण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली. रोहित पवारांनीही हा मुद्दा उचलून धरला, मात्र आमच्यासारख्या नियुक्ती अडकलेल्या विद्यार्थ्यांचं काय? शासन आमच्याकडे कधी लक्ष देणार?" असा सवालही तिनं विचारला आहे.

हे वाचा -MPSC Special: जिद्दीनं तहसीलदारपदी झाली निवड पण नियुक्तीच नाही; निवडला हा मार्ग

...तर मार्ग उरणार नाही

मराठा आरक्षण आणि SBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून जर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली तर आम्ही कोणाकडे बघायचं? माझी नियुक्ती रद्द झाली तर माझ्याकडे जगण्यासाठी कारणच उरणार नाही आई-वडील गेल्यामुळे माझं कोणीच नाही. त्यामुळे माझ्याकडे टोकाचं पाऊल उचलण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरणार नाही" असं सोनाली म्हणाली.

मात्र सोनाली भाजीभाकरे अजूनही हिम्मत हरलेली नाही किंवा खचली नाही. ग्रामीण भागातील अभ्यासू आणि होतकरू मुलींसाठी सोनाली एक प्रेरणा आहे. सरकार आणि MPSC अशा होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टानं मिळालेला जॉब देईल आणि त्यांना पदावर नियुक्ती देईल अशी आशा सध्या सोनाली बाळगून आहे.

First published:

Tags: Jobs, Maharashtra, Mpsc examination, Mumbai, Solapur, Tahsildar