मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तुमच्या आवडत्या कंपनीमध्ये जॉब हवाय? मग 'या' महत्त्वाच्या गोष्टी करायला कधीच विसरू नका

तुमच्या आवडत्या कंपनीमध्ये जॉब हवाय? मग 'या' महत्त्वाच्या गोष्टी करायला कधीच विसरू नका

जर तुम्हाला तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब हवा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक आहे.

जर तुम्हाला तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब हवा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक आहे.

जर तुम्हाला तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब हवा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 06 जुलै: एखाद्या क्षेत्रात करिअर (Career) करायचं आपण ठरवलं  तर त्या क्षेत्रातील एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये (Big Company) जॉब करण्याची आपली इच्छा असते. हळूहळू करिअरमध्ये समोर जाताना ही कंपनी आपली ड्रीम कंपनी (Dream Company Jobs) बनते. त्या कंपनीमध्ये जॉब मिळवण्यासाठी अनुभवाची गरज असते. मात्र काही वेळा अनुभव असतानाही आपल्याला त्या कंपनीत जॉब मिळू शकत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे आपण न केलेले प्रयत्न. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब (latest jobs) हवा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक आहे. याच गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कंपनीची वेबसाईट तपासात राहा

तुमच्या आवडत्या कंपनीची वेबसाईट नेहमी तपासात राहा. इथे तुम्हाला त्या कंपनीमध्ये असलेल्या काही पदभरती संदर्भात माहिती मिळू शकेल. तसंच इतर माहितीही मिळू शकेल.

जॉब प्रोफाइल

तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी तुमच्या अंगी त्या कंपनीला पाहिजे असणारे गुण असणं आवश्यक आहे. तसंच तुमची आताची जॉब प्रोफाइल त्या कंपनीला सूट करणारी आहे का हे हि तुम्हाला बघणं महत्त्वाचं असणार आहे.

हे वाचा -Educational Documents हरवले? आता नो टेन्शन, एका क्लिकवर मिळणार नवी कागदपत्रं

कंपनीच्या HR ला मेल करा

जर तुम्हाला वाटत असेल की कंपनीच्या वेबसाइटवर अर्ज करूनही तुम्हाला कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर जास्त वेळ वाया घालवू नका.  सर्व आवश्यक कागदपत्रांसह कंपनीच्या HR विभागाकडे तुमचा Resume पाठवा.

Interview साठी राहा तयार

तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब घेण्यासाठी तुम्ही सतत तयार असणं महत्त्वाचं आहे. अप्लाय केल्यानंतर Interview साठी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तसंच Interview दरम्यान  विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Career opportunities, Job alert, Jobs