• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • SBI PO Recruitment 2021: एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! या 2056 पदांवर होणार भरती; कसा कराल अर्ज?

SBI PO Recruitment 2021: एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! या 2056 पदांवर होणार भरती; कसा कराल अर्ज?

देशातील सर्वात मोठी बँक (Bank job Alert) असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (Jobs in SBI) नोकरीची संधी निर्माण झाली आहे. SBI ने प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO job Alert) पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर: देशातील सर्वात मोठी बँक (Bank job Alert) असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (Jobs in SBI) नोकरीची संधी निर्माण झाली आहे.  SBI ने प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO job Alert) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एसबीआय बँक पीओ अधिकारी म्हणून जॉइन करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. एसबीआय पीओ नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना पात्रता, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, अर्ज शुल्क, कॉल लेटर, परीक्षा प्रक्रिया आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. या सर्वाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. वाचा सविस्तर याठिकाणी नोकरी मिळवण्याकरता सर्व उमेदवारांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन (Online Registration for SBI Bank job) करावे लागेल. ही प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडेल. तुम्ही अर्ज करण्यापूर्वी बँकेच्या वेबसाइटवर दिलेली सविस्तर माहिती वाचणे आवश्यक आहे. याठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी आवश्यक पात्रतेबाबत माहिती मिळेल. लक्षात ठेवा या तारखा ऑनलाइन रजिस्ट्रेशन: 5 ते 25 ऑक्टोबर फेज-I: ऑनलाइन प्राथमिक परीक्षा- नोव्हेबंर/डिसेंबर 2021 फेज-II:ऑनलाइन मुख्य परीक्षा- डिसेंबर 2021 फेज-III: मुलाखत (मुलाखत आणि ग्रुप एक्सरसाइज) - फेब्रुवारी 2022 चा दुसरा/तिसरा आठवडा हे वाचा-Micro Focus Recruitment: या IT कंपनीत डेव्हलपर्सच्या जागांसाठी फ्रेशर्सना संधी शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकार द्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता. जे पदवीच्या अंतिम वर्ष/सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील या अटीचं पालन करून अर्ज करू शकतात. जेव्हा त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, तोपर्यंत त्यांना 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांची पास झाल्याची ग्रॅज्युएशन डिग्री दाखवावी लागेल. IDD प्रमाणपत्र असणाऱ्यांना याची खात्री करून घेणे आवश्यक आहे की त्यांचे आयडीडी पास करण्याची तारीख 31 डिसेंबर 2021 किंवा त्यापूर्वीची आहे की नाही. चार्टड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटची पात्रता असणारे उमेदवार देखील याकरता अर्ज करू शकतात. काय आहे वयाची मर्यादा? 1 एप्रिल 2021 पर्यंत उमेदवाराचे वर 21 वर्षांपेक्षा कमी किंवा 30 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. अर्थात उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 2000 नंतरचा आणि 2 एप्रिल 1991 पूर्वीचा असता कामा नये. हे वाचा-Satara Job Alert: किसान वीर महाविद्यालय सातारा इथे 61 जागांसाठी भरती कशाप्रकारे कराल अर्ज उमेदवारांना केवळ 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अन्य कोणतीही पद्धत विचारात घेतली जाणार नाही. उमेदवारांना बँकेची करिअर वेबासाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers यावरून अर्ज करावा लागेल. नोंदणीनंतर उमेदवारांना डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/ इंटरनेट बँकिंगचा वापर करून ऑनलाइन मोडने पेमेंट करावे लागेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: