मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Micro Focus Recruitment: या IT कंपनीत डेव्हलपर्सच्या जागांसाठी फ्रेशर्सना मिळणार नोकरीची संधी; या ठिकाणी असेल जॉब

Micro Focus Recruitment: या IT कंपनीत डेव्हलपर्सच्या जागांसाठी फ्रेशर्सना मिळणार नोकरीची संधी; या ठिकाणी असेल जॉब

या IT कंपनीमध्ये काही जागांसाठी फ्रेशर्सना नोकरीची (Micro Focus Jobs) मोठी संधी मिळणार आहे.

या IT कंपनीमध्ये काही जागांसाठी फ्रेशर्सना नोकरीची (Micro Focus Jobs) मोठी संधी मिळणार आहे.

या IT कंपनीमध्ये काही जागांसाठी फ्रेशर्सना नोकरीची (Micro Focus Jobs) मोठी संधी मिळणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

बंगलोर, 04 ऑक्टोबर:  कोरोनामुळे सध्या सर्व IT कंपनी वर्क फ्रॉम होम (Work from home) करत आहेत. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना परत ऑफिसमध्ये बोलावण्यास (Work From Home Ends) सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगानं आता कंपन्यांनी कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पुन्हा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच Micro Focus (Micro Focus IT company jobs) या IT कंपनीमध्ये काही जागांसाठी फ्रेशर्सना नोकरीची (Micro Focus Jobs) मोठी संधी मिळणार आहे.

या पदांसाठी भरती

जुनिअर UI डेव्हलपर (Junior UI Developer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

जुनिअर UI डेव्हलपर (Junior UI Developer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवरांनी Computer Science, Information Systems किंवा संबंधित ब्रांचमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

त्याचबरोबर उमेदवारांना 0-2 वर्षांचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना software systems design tools चा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच कंप्यूटर लँग्वेज शिकणं आवश्यक आहे.

उमेदवारांमध्ये analytical and problem-solving skills असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना बेसिक testing, coding, आणि debugging प्रक्रिया माहिती असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. तसंच इंग्रजी भाषेवर कमांड असणं आवश्यक आहे.

हे वाचा - End Of Work From Home: भारतातील या मोठ्या कंपन्या लवकरच बंद करणार वर्क फ्रॉम होम

अशी असेल जॉब प्रोफाइल

या पदभरतीदरम्यान निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नवीन प्रॉडक्ट्स आणि सॉफ्टवेअर्सना डिझाईन, डिबग, ट्रबलशूट करावं लागणार आहे.

अशा पद्धतीनं करा अप्लाय

अप्लाय करण्यासाठी सुरुवातीला microfocus.com या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

यानंतर होमपेजवर जाऊन सर्वात खाली असणाऱ्या Career या टॅबवर क्लिक करा.

Micro Focus Junior UI Developer Jobs इतपर्यंत सर्फ करा.

लिंक सापडल्यावर त्यावर लगेच क्लिक करा.

लिंक ओपन केल्यानंतर त्यावर संपूर्ण माहिती घेऊन आपली माहिती भरा.

यानंतर रजिस्ट्रेशन करा आणि सबमिट करा.

या पदभरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Wipro NTH मध्ये फ्रेशर्सना संधी

देशातील नामांकित IT कंपनी Wipro (Wipro jobs for freshers) मध्ये लवकरच फ्रेशर्ससाठी मोठी पदभरती होणार आहे. Wipro नं फ्रेशर्ससाठी Wipro Off Campus Drive आयोजित केलं आहे. या माध्यमातून फ्रेशर्सना नोकरची संधी मिळणार आहे. Wipro ला कोरोनाच्या काळातही मोठा नाफेझ आला आहे त्यामुळे आता Wipro कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या (Wipro NTH latest jobs) तयारीत आहे. 2020 आणि 2021 या बॅचेसच्या उमेदवारांना या ऑफ कॅंपस ड्राइव्हसाठी अप्लाय करता येणार आहे. Wipro Elite Off Campus FY’20 & FY’21 असं या ऑफ कॅंपस ड्राईव्हचं नाव असणार आहे.

या पदभरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

First published:

Tags: Career opportunities, जॉब