जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IT Jobs: फ्रंट एंड डेव्हलपर्ससाठी वाट्टेल तितके पैसे मोजतात कंपन्या; जॉबसाठी आधी ही माहिती असणं आवश्यक

IT Jobs: फ्रंट एंड डेव्हलपर्ससाठी वाट्टेल तितके पैसे मोजतात कंपन्या; जॉबसाठी आधी ही माहिती असणं आवश्यक

अजून 10,000 जणांची करणार भरती

अजून 10,000 जणांची करणार भरती

या लेखमालेत आम्ही भारतातल्या तरुणांसाठी आयटी क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि त्या मिळवण्यासाठी काय शिक्षण वा प्रशिक्षण घ्यावं, हे सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत.

    मुंबई, 19 जुलै:    भारत हा अगदी 1990च्या दशकापासूनच जगाचा ‘आउटसोर्सिंग हब’ म्हणून ओळखला जातो. कॉस्ट आर्बिट्रेज, प्राइस-कॉम्पिटिटिव्ह रिसोर्सेस आणि ग्राहकांच्या ऑर्डर्स मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रोजेक्ट स्वीकारण्याची कंपन्यांची लवचिकता, ही याची मुख्य कारणं आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारत देश हा विषय तज्ज्ञांची भूमी (Land of Subject matter experts) म्हणूनही उदयास आला आहे. विशेषतः इंजिनीअरिंग आणि आयटी डेव्हलपमेंट क्षेत्रात हेच चित्र दिसून येतं. कोरोना महामारीने जगातल्या सर्व मोठमोठ्या अर्थव्यवस्थांनाही पाणी पाजलं. परिणामी सर्वच लहान-मोठ्या संस्थांना संवाद साधण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यास भाग पाडलं. यामुळे वर्क फ्रॉम होम (WFH), हायब्रिड मॉडेल्स (Hybrid models) अशा कामाच्या नव्या पद्धती विकसित झाल्या. यामुळे कर्मचाऱ्यांना यापूर्वी कधीही मिळाली नव्हती अशी लवचिकता कामामध्ये मिळू लागली. जवळपास सर्व कामं ऑनलाइन होत असल्यामुळे आयटी डेव्हलपर्सची मागणी (Demand of IT Developers) सध्या वाढली आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, ऑपरेशन आणि क्लाउडशी संबंधित व्यक्ती, डेटा इंजिनीअर्स आणि संज्ञानात्मक तंत्रज्ञानातल्या तज्ज्ञांचा (Experts of Cognitive Technologies) समावेश होतो. या क्षेत्रांमधल्या व्यक्तींसाठी दररोज असंख्य संधी उपलब्ध होत आहेत. एखाद्याकडे योग्य कौशल्य असेल, तर ती व्यक्ती घरी बसून जगभरात कुठेही आपली सेवा पुरवू शकते. या क्षेत्रात पगाराला कोणतीही कमाल मर्यादा नाही. त्यामुळे योग्य कौशल्य असणारी व्यक्ती आपल्या स्टडी टेबलवर बसूनही लाखो रुपये कमावू शकते. या लेखमालेत आम्ही भारतातल्या तरुणांसाठी आयटी क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि त्या मिळवण्यासाठी काय शिक्षण वा प्रशिक्षण घ्यावं, हे सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत. अद्याप सुरुवात न केलेल्यांसाठी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काही सोप्या प्रक्रियांचा समावेश होतो. गरजा शोधणं (BA) सॉफ्टवेअरच्या कार्याबाबत विचार करणं (PM) वापर आणि प्रतिबद्धता (UI/UX) ते कसं तयार करायचं याबाबत नियोजन करणं (Architecture) ते वेगवेगळ्या प्रकारे तयार करणं (Delivery) त्याची देखभाल करणं (DevOps) ते वेळोवेळी अपडेट करणं (CI/CD/CM) IT कंपनीत डेटाबेस डेव्हलपर्सना मिळतो लाखो रुपये पगार; काय असते जॉब प्रोफाइल? इथे मिळतील डिटेल्स सॉफ्टवेअर केवळ स्थापित सिस्टीमवर काम करील, की त्यावर वेबद्वारे कोणालाही प्रवेश करता येईल हे तुम्ही ठरवू शकता. सॉफ्टवेअर प्रक्रिया आणि डेटा यांचं कशा प्रकारे व्यवस्थापन आणि नियंत्रण करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता. ते सुरक्षित ठेवण्यासाठी काही सुरक्षा फीचर्स तयार करू शकता किंवा तुमचं सॉफ्टवेअर इतर सॉफ्टवेअरशी कसं संवाद साधेल हे तुम्ही ठरवू शकता. डेटा, वापरकर्ते आणि वापर या सगळ्याच्या प्रमाणानुसार सॉफ्टवेअरला तगडं क्लाउड आणि बिग डेटा तंत्रज्ञानच्या (Big Data Technology) आधाराची गरज भासू शकते. सध्या कंपन्या डाउनलोड करण्यायोग्य सॉफ्टवेअर विकण्याऐवजी त्यांच्या एसएएएस मॉड्यूलमध्ये (SaaS Module) प्रवेश देऊन, थेट ऑनलाइन सॉफ्टवेअर वापरण्याची सोय उपलब्ध करून देतात. या पार्श्वभूमीवर, सर्वांनाच ही चार महत्त्वाची कामं शिकणं गरजेचं ठरतं : फ्रंट एंड डेव्हलपर्स (सॉफ्टवेअर सर्वांना कसे दिसेल याची बांधणी करणारे) बॅक एंड डेव्हलपर्स (सॉफ्टवेअरचं काम कसं चालेल याची बांधणी करणारे) डेटाबेस डेव्हलपमेंट (फ्रंट एंड आणि बॅकएंड यांना डेटा प्रोसेसिंग आणि स्टोरेजशी संवाद साधण्यासाठीची बांधणी करणारे) एपीआय आणि डेव्हऑप्स (सॉफ्टवेअरला इतर सॉफ्टवेअरसह प्लग आणि इंटिग्रेट करण्यासाठी किंवा क्लाउडवर व्यवस्थापन करण्यासाठीची कौशल्यं) सध्याच्या ट्रेंडनुसार, सॉफ्टवेअर डीप्लॉय केल्यानंतर (म्हणजे ते आवश्यक ठिकाणी तैनात केल्यानंतर) त्याचं अपग्रेड CI/CD/CM प्रक्रियेद्वारे होत राहतं. CI म्हणजे कंटिन्युअस इंटिग्रेशन, CD म्हणजे कंटिन्युअस डीप्लॉयमेंट आणि CM म्हणजे कंटिन्युअस मॉनिटरिंग. यामुळेच आपल्याला वेळोवेळी आपल्या सॉफ्टवेअरवरची अ‍ॅप्स अपडेट करण्याचं नोटिफिकेशन येतं. क्लाउड टेक्नॉलॉजीमुळे (Cloud Technology) कंपन्या आपल्या ऑफिसमधून आपल्या मोबाइलमधलं अ‍ॅप अपडेट करू शकतात. ‘अपडेट’ पर्यायावर टॅप केल्यानंतर अ‍ॅपचं सर्वांत लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड होतं आणि बसल्या जागी तुमच्या स्मार्टफोनमधल्या अ‍ॅपचं सॉफ्टवेअर अपडेट होतं. तंत्रज्ञान सध्या अभूतपूर्व अशा वेगाने विकसित होत आहे. यामुळे आता विविध उपकरणं, यंत्रसामग्री आणि विस्तृत एंटरप्राइज सिस्टीम (Extensive Enterprise systems) अशा बऱ्याच कार्यांसाठी सॉफ्टवेअरची गरज भासत आहे. हे काही तात्पुरतं ट्रेंडिंग असलेलं फॅड नाही. येत्या 25 वर्षांमध्ये सेवा क्षेत्रातल्या बहुतांश नोकऱ्या या सॉफ्टवेअरशी संबंधित (Software related jobs in next 25 years) असणार आहेत. तेव्हा, मला जर यातल्या एखाद्या नोकरीबाबत सांगायचं असेल (उदा. फ्रंट एंड डेव्हलपर), तर मी अशा प्रकारे अ‍ॅप्रोच करण्याचा सल्ला देईन : फ्रंट एंड डेव्हलपर का बनायचं? - सध्या जवळपास सर्वच ऑनलाइन आहेत. वेबसाइट असो वा अ‍ॅप, यामध्ये एक भाग असा असतो, की ज्याच्याशी वापरकर्त्यांचा थेट संपर्क येतो. जेव्हा तुम्ही लॉगिन करता, तेव्हा वेलकम पेज, मेनू, साइट मॅप आणि अशा बऱ्याच गोष्टी समोर येतात, ज्यामुळे त्या अ‍ॅपचा वा वेबसाइटचा वापर करणं सुलभ होतं. या सर्व गोष्टींना ‘फ्रंट एंड’ (What is Front-end) म्हटलं जातं. फ्रंट एंड डेव्हलपर (Front-end Developer) किंवा फ्रंट एंड वेब डेव्हलपर (Front-end web developer) ही अशी व्यक्ती असते जिच्याकडे या इंटरफेसचं डिझाइन आणि अंमलबजावणीची जबाबदारी असते. वापरकर्त्यांना अ‍ॅप्लिकेशन वापरण्यासाठी या इंटरफेसची (User Interface) गरज भासते. वेब डिझायनर वेबसाइटचा लूक तयार करतात, तर फ्रंट एंड डेव्हलपर्स ते वेब डिझाइन ऑनलाइन काम करील हे सुनिश्चित करतात. यासाठी ते CSS, HTML आणि जावास्क्रिप्ट अशा कोडिंग लँग्वेजेसचा (Coding Languages) वापर करतात. Gmail वरून इंटरनेट नसतानाही पाठवता येईल ई-मेल, जाणून घ्या सोपी ट्रिक फ्रंट एंड डेव्हलपर्सची गरज कोणत्या ठिकाणी? - सॉफ्टवेअर एंगेजमेंटची गरज असणाऱ्या सर्व कंपन्यांना फ्रंट एंड डेव्हलपर्सची गरज (Need of Front-end Developers) भासते. ज्युनिअर, मिडल किंवा सीनिअर अशा विविध स्तरांवरच्या पदांवर कंपन्या नोकरी देतात. वेब आणि अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट कंपन्या, आयटी कंपन्या, कन्सल्टिंग कंपन्या आणि हेल्थ, फायनान्स, रिटेल अशा क्षेत्रांमधल्या कंपन्यांनादेखील फ्रंट एंड डेव्हलपर्सची गरज (Who hire front-end developers) भासते. - या कंपन्या कुठे आहेत? - अशा प्रकारच्या कंपन्या (Companies that need Front-end developers) भारत, जर्मनी, अमेरिका, बेल्जियम, फ्रान्स, ब्राझील अशा विविध देशांमध्ये आहेत. आफ्रिका, साउथ अमेरिका असे देशही आता आयटीमध्ये पुढे येत आहेत. तसंच, भारतातही टिअर-2 किंवा टिअर-3 शहरांमध्ये आयटी कंपन्यांची सेंटर्स सुरू होत आहेत. पगार किती मिळू शकतो? - एका फ्रंट-एंड डेव्हलपरला वर्षाला 3 ते 15 लाख रुपये पगार (Salary of a Front-end Developer) मिळू शकतो. तुमचा अनुभव आणि कौशल्यं यानुसार हा आकडा बदलतो. काय माहिती असणं गरजेचं? - सॉफ्टवेअर/वेब अ‍ॅप्लिकेशनमध्ये तुम्हाला काय आवडतं ते शोधणं. (वाचा, रिसर्च करा, काळानुसार बदलत राहा.) - तुमच्या संस्थेची वेबसाइट सर्व प्रकारच्या डिव्हाइसवर उत्तमरीत्या चालण्याची हमी देण्यासाठी योग्य वेब डिझाइन स्टँडर्ड्स वापरणं. - अ‍ॅप्लिकेशन विकसत करण्यासाठी असं फ्रेमवर्क तयार करणं, जे कंपनी आणि वापरकर्त्यांच्या मागणीनुसार अपडेट करता येईल. - सॉफ्टवेअर हे वापरकर्त्यांना वापरासाठी आणि उपयोगासाठी सोपं असेल असं बनवणं. - वेबसाइटच्या कामगिरीवर लक्ष ठेवणं. वेबसाइट वापरात अडचण येत असल्यामुळे ट्रॅफिक कमी होत आहे का हे तपासत राहणं आणि शक्य तितक्या लवकर समस्यांकडे लक्ष देणं. - डेव्हलपमेंट टीमसोबत अ‍ॅप्लिकेशन आणि फीचर कोड याचं पुनरावलोकन करणं. तसंच, वेबसाइटमध्ये भविष्यात सुधारणा आणि वाढ करण्याबाबत चर्चा करणं. - वेबसाइटसाठी अ‍ॅप्स आणि फीचर्स तयार करण्यास मदत करणं, तसंच सॉफ्टवेअरच्या तर्काशी (Software logic) संबंधित इंटर्नल अ‍ॅक्टिव्हिटीज आणि इंटरॅक्शनसाठी मदत करणं. IT क्षेत्रात DevOps आणि API ला आहे प्रचंड मागणी; यात करिअर कराल तर लाईफ सेट आणखी गरजा काय आहेत? - कॉम्प्युटर सायन्स वा संबंधित विषयातली डिग्री (Computer Science degree) असणं किंवा यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ पाहणं. - एचटीएमएल, सीएसएस, जावास्क्रिप्ट आणि जेक्यूरी (jQuery) अशा कोडिंग लँग्वेजेसचं ज्ञान असणं. - सर्व्हर-साइड सीएसएसची माहिती असणं. - ग्राफिक डिझाइन सॉफ्टवेअर हाताळता येणं. (उदा. Adobe Illustrator) - एसईओचं (SEO) मूलभूत ज्ञान असणं. - सहकारी, मॅनेजर, क्लायंट यांच्यासोबत प्रभावीपणे संवाद साधण्याचं कौशल्य, तसंच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कौशल्यं असणं. - टीमसोबत काम करण्यासाठी इंटरपर्सनल कौशल्यं (interpersonal Skills) असणं. स्वतःला कसं प्रशिक्षित करायचं? - सीएसएस, जावास्क्रिप्ट आणि एचटीएमएल या कोडिंग लँग्वेजेस शिकून घ्या. रिअ‍ॅक्ट, व्हू (Vue) किंवा अँग्युलर अशा फ्रेमवर्कसह त्याचा पाठपुरावा करा. - या कामाबद्दल (फ्रंट एंड डेव्हलपर) मित्रांकडून किंवा ऑनलाइन, स्वतः रिसर्च करून जेवढी माहिती घेता येईल तेवढी घ्या. - आपल्या कौशल्यांचा सराव करत राहा – स्वतःची डमी वेबसाइट आणि अ‍ॅप्लिकेशन्स तयार करा, जेणेकरून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सुधारणा होत राहील. - कमांड लाइन आणि व्हर्जन कंट्रोल (Command line and Version control) याबाबत शिकून घ्या. फ्रंट एंड स्किल्सनंतर पुढे काय? - ट्युटोरिअल, टूल्स आणि ओपन-सोर्स प्रोजेक्ट्स शोधा. - फ्रंट एंड डेव्हलपर क्लासमध्ये प्रवेश घ्या. अनुभवी व्यक्तींकडून शिस्तबद्ध वातावरणात शिकणं हे कधीही फायद्याचं आहे. - ज्युनिअर फ्रंट-एंड डेव्हलपर म्हणून काम करा. - नवीन कौशल्यं आत्मसात करण्यासाठी कधी कधी अधिक माहिती असणाऱ्या व्यक्तींच्या हाताखाली काम करणं हाच सर्वोत्तम मार्ग असतो, हे लक्षात घ्या. मला आशा आहे, की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटबाबतचा (Software Development Crash Course) हा क्रॅश कोर्स (आर्टिकल-1) उपयुक्त होता. या आणि इतर तांत्रिक कौशल्यांबाबत, तसंच त्यासंबंधीच्या कामाबाबत आम्ही पुढील लेखांमध्ये माहिती देऊ. वाचत राहा!

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात