मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IT कंपनीत डेटाबेस डेव्हलपर्सना मिळतो लाखो रुपये पगार; काय असते जॉब प्रोफाइल? इथे मिळतील डिटेल्स

IT कंपनीत डेटाबेस डेव्हलपर्सना मिळतो लाखो रुपये पगार; काय असते जॉब प्रोफाइल? इथे मिळतील डिटेल्स

आजच्या डिजिटल युगामध्ये, जवळपास प्रत्येक व्यवसाय हा त्या-त्या क्षेत्रातल्या वापरकर्त्यांनी तयार केलेल्या भरपूर अशा डेटावर अवलंबून असतो. त्यामुळेच हा सर्व डेटा व्यवस्थित गोळा करून, तो व्यवस्थित ठेवणं ही बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे. तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलामध्ये डेटाच्या स्वरूपामध्येही मोठा बदल झाला आहे. परिणामी डेटा गोळा करण्याची, साठवण्याची आणि तो सांभाळण्याची पद्धतही बदलली आहे.

आजच्या डिजिटल युगामध्ये, जवळपास प्रत्येक व्यवसाय हा त्या-त्या क्षेत्रातल्या वापरकर्त्यांनी तयार केलेल्या भरपूर अशा डेटावर अवलंबून असतो. त्यामुळेच हा सर्व डेटा व्यवस्थित गोळा करून, तो व्यवस्थित ठेवणं ही बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे. तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलामध्ये डेटाच्या स्वरूपामध्येही मोठा बदल झाला आहे. परिणामी डेटा गोळा करण्याची, साठवण्याची आणि तो सांभाळण्याची पद्धतही बदलली आहे.

आजच्या डिजिटल युगामध्ये, जवळपास प्रत्येक व्यवसाय हा त्या-त्या क्षेत्रातल्या वापरकर्त्यांनी तयार केलेल्या भरपूर अशा डेटावर अवलंबून असतो. त्यामुळेच हा सर्व डेटा व्यवस्थित गोळा करून, तो व्यवस्थित ठेवणं ही बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे. तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलामध्ये डेटाच्या स्वरूपामध्येही मोठा बदल झाला आहे. परिणामी डेटा गोळा करण्याची, साठवण्याची आणि तो सांभाळण्याची पद्धतही बदलली आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 19 जुलै:  डेटाबेस डेव्हलपर्सबाबत (Database Developers) जाणून घेण्यापूर्वी आपण डेटाबेस म्हणजे काय हे पाहू या. डेटाबेस (Database) म्हणजे अशी जागा जिथे आपण माहिती गोळा करतो, साठवतो आणि तिच्यावर प्रक्रिया करतो. जेव्हा एखादं अ‍ॅप्लिकेशन काम करतं, तेव्हा ते आपण देत असलेली डेटाबेसमध्ये साठवून, डेटाबेसमधली माहिती आपल्याला पुरवत असतं. युझर इंटरफेस हा अ‍ॅपचा चेहरा आहे असं म्हटलं आणि बॅक-एंड म्हणजे त्या अ‍ॅपचा मेंदू आहे असं समजलं, तर डेटाबेस हे त्या अ‍ॅपचं हार्ट (Database is Heart of application) आहे असं म्हणता येईल. आपलं हृदय ज्याप्रमाणे संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा करत असतं, तसंच डेटाबेस हा संपूर्ण अ‍ॅपमध्ये माहितीचा पुरवठा करत असतो. आजच्या डिजिटल युगामध्ये, जवळपास प्रत्येक व्यवसाय हा त्या-त्या क्षेत्रातल्या वापरकर्त्यांनी तयार केलेल्या भरपूर अशा डेटावर अवलंबून असतो. त्यामुळेच हा सर्व डेटा व्यवस्थित गोळा करून, तो व्यवस्थित ठेवणं ही बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे. तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलामध्ये डेटाच्या स्वरूपामध्येही मोठा बदल झाला आहे. परिणामी डेटा गोळा करण्याची, साठवण्याची आणि तो सांभाळण्याची पद्धतही बदलली आहे. डेटाबेस म्हणजे आधी एखादी मोठी खोली असायची, ज्यात भरपूर रॅक आणि त्यामध्ये भरपूर फाइल्स असायच्या; मात्र आता व्हिडिओ, फोटो, ऑडिओ अशा आणखी बऱ्याच पद्धतींनी डेटा साठवून ठेवता येतो आहे. डेटा तयार होण्याच्या पद्धतींमध्ये वेगाने झालेल्या या बदलामुळे डेटाबेस डेव्हलपरला (Need of Database Developer) आणखी महत्त्व आलं आहे. यामुळेच डेटाबेस डेव्हलपर्स हे कोणत्याही कंपनीमधले महत्त्वाचे घटक झाले आहेत. Gmail वरून इंटरनेट नसतानाही पाठवता येईल ई-मेल, जाणून घ्या सोपी ट्रिक कोणत्याही संस्थेमध्ये डेटा मॅनेजमेंटशी संबंधित दोन प्रमुख भूमिका असतात – डेटाबेस डेव्हलपर आणि डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन. यासाठी सहसा स्वतंत्र व्यक्तींची वा टीम्सची नेमणूक केलेली असते; मात्र कमी बजेट किंवा छोटा डेटाबेस असणाऱ्या कंपन्या या दोन्ही कामांसाठी एकच व्यक्ती किंवा टीम नेमते. या लेखामध्ये तुम्हाला डेटाबेस डेव्हलपर (Database Developer roles) कोण असतो, त्याचं नेमकं काम काय असतं याबाबत माहिती मिळणार आहे. यासोबतच, डेटाबेस डेव्हलपर होण्यासाठी तुमचं शिक्षण काय असायला हवं आणि या क्षेत्रात (Career as Database Developer) किती संधी आहेत हेदेखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला डेटाबेस डेव्हलपर म्हणून करिअर करायचं असल्यास हा लेख तुमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक (Career tips) ठरेल. डेटाबेस डेव्हलपर म्हणजे काय? त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या काय असतात? डेटाबेस डेव्हलपर्सना डेटाबेस डिझायनर (Database Designer) आणि डेटाबेस प्रोग्रामर (Database Programmer) म्हणूनदेखील ओळखलं जातं. नवीन डेटाबेस डिझाइन करणं, तयार करणं, प्रोग्राम करणं किंवा प्लॅटफॉर्म अपडेट्सनुसार आणि वापरकर्त्यांच्या मागणीनुसार जुने डेटाबेस सातत्याने मॉडिफाय करणं अशी कामं (Responsibilities of Database Developer) डेटाबेस डेव्हलपर्स करतात. आपल्या कंपनीला वा क्लायंटला योग्य अशी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम सुचवण्याचं कामही डीबी डेव्हलपर्स करतात. याव्यतिरिक्त एखाद्या डेटाबेस प्रोग्रामची तपासणी करणं, त्याचा परफॉर्मन्स पाहणं आणि त्यात काही बग्ज असतील तर ट्रबलशूट (Troubleshoot) करणं ही कामंही डीबी डेव्हलपर्सची असतात. थोडक्यात सांगायचं झाल्यास, डेटाबेस डेव्हलपर्स हे आयटी कर्मचारी असतात, जे दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे डेटाबेसशी व्यवहार करतात. प्रामुख्याने आपल्या संस्थेच्या डेटाबेसची रेंज आणि कार्यक्षमता सुधारणं आणि विस्तृत करणं हे त्यांचं मुख्य काम असतं. याव्यतिरिक्त त्यांच्यावर पुढील जबाबदाऱ्या असतात :
 • डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम डिझाइन करणं.
 • डेटाबेस डॉक्युमेंटेशन तयार करणं आणि ते अद्ययावत ठेवणं.
 • प्रोजेक्टच्या वैशिष्ट्यांचं विश्लेषण करणं आणि नवीन फीचर्स तयार करणं.
 • कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वापरून प्रोग्रामिंग कोड लिहिणं आणि सुधारित करणं.
 • त्रुटी दूर करण्यासाठी प्रोग्राम कोडमध्ये बदल करणं आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करणं.
 • कोडमधला बग ओळखून तो दुरुस्त करणं.
 • विश्लेषणात्मक आणि प्रसंगी कठोर चाचणी तंत्राचा वापर करून समस्यांचं निराकरण करणं.
 • टेस्टिंग मॉड्यूल आणि प्रमाणीकरणं प्रक्रिया तयार करणं.
 • अ‍ॅप्लिकेशनला धक्का न पोहोचवता लाइव्ह एन्व्हायर्न्मेंटमध्ये कोड डिप्लॉय करणं.
डीबी डेव्हलपर्सचं (DB Developers) काम पूर्णपणे तांत्रिक असल्यामुळे, टेक सॅव्ही (Tech Savvy) व्यक्तींसाठी हा योग्य पर्याय ठरतो. सतत बदलत असलेल्या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्यासाठी विशिष्ट कौशल्यं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ही कौशल्यं तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढच्या स्तरावर जाण्यासाठी – म्हणजेच फुल स्टॅक डेव्हलपर (Full Stack Developer) बनण्यासाठी फायद्याची ठरतात. डेटाबेस डेव्हलपर बनण्यासाठी काय शिक्षण आणि कौशल्यं आवश्यक असतात? खरं तर तुम्ही औपचारिक शिक्षण घेतलं नसलं तरीही डेटाबेस डेव्हलपर बनू शकता; मात्र कंपन्या नोकरी देताना कम्प्युटर सायन्स किंवा त्यासंबंधी क्षेत्रातली डिग्री वा डिप्लोमा (Education needed to be Database Developer) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतात; मात्र केवळ ही पदवी तुमच्याकडे असणं पुरेसं नाही. तुम्हाला भरपूर टेक्निकल ज्ञान (Technical knowledge) असणं गरजेचं आहे. सोबतच विश्लेषण कौशल्य, समस्या निराकरण करण्याचं कौशल्य आणि ऑर्गनायझेशनल स्किल सेट असणं गरजेचं आहे. सोबतच, डेटाबेस डेव्हलपर म्हणून तुमच्यात काही स्वभाववैशिष्ट्यं असणंही गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास, तुम्हाला टीमसोबत काम करता येणं आवश्यक आहेच; मात्र गरज भासल्यास एकट्याने जबाबदारीदेखील घेता यायला हवी. कारण, कित्येक वेळा डेटाबेस सोल्यूशन आणि सिस्टीम टेस्टिंग तुम्हाला स्वतःलाच करावं लागतं. IT क्षेत्रात DevOps आणि API ला आहे प्रचंड मागणी; यात करिअर कराल तर लाईफ सेट
 • डेटाबेस डेव्हलपरकडे ही कौशल्यं असायला हवीत :
 • ओरॅकल डेटाबेस आणि एसक्यूएल सर्व्हर्सबाबत (SQL servers) पूर्ण माहिती.
 • एसक्यूएल, टी-एसक्यूएल (T-SQL) आणि पीएल/एसक्यूएल (PL/SQL) यांबाबत माहिती.
 • डेटाबेस डिझाइन आणि डेव्हलपमेंटचा अनुभव.
 • NoSQL सारख्या नॉन-रिलेशनल डेटाबेसची माहिती.
 • विंडोज आणि लिनक्स (Linux) यांसारख्या ऑपरेटिंग सिस्टिम्सची बेसिक माहिती.
 • सिस्टीम अ‍ॅनालिसिस करण्याची क्षमता.
 • सी++, जावा, आणि सी# अशा विविध प्रोग्रामिंग लँग्वेजेसची माहिती.
 • पायथन, जावास्क्रिप्ट आणि पीएचपी अशा विविध स्क्रिप्टिंग लँग्वेजेसची माहिती.
 • वेब सर्व्हर्स, इंटरफेस, आयटी मॅनेजमेंट आयटी टूल्स या सर्व गोष्टींची माहिती.
 • प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सिस्टीम इंटिग्रेशन आणि क्वालिटी टेस्टिंगचा अनुभव.
 • नवीन डेटाबेससाठी इम्प्लिमेंटेशन करण्याची पद्धत माहिती हवी.
 • - डेटाबेस डेव्हलपर्सना एवढी मागणी का आहे?
-आयटी, मॅनेजमेंट, हेल्थकेअर किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये डेटाबेस डेव्हपर्सचं काम अगदी महत्त्वाचं असतं. या सर्व क्षेत्रांमध्ये कंपन्यांची वाढ अगदी पद्धतशीरपणे होत असते आणि ती बऱ्याच अंशी डेटा कलेक्शन, जनरेशन आणि डेटा प्रोसेसिंग यावर अवलंबून असते. या कंपन्यांमधल्या डेटा फाइल्स खूप मोठ्या असतात आणि त्यांमध्ये भरपूर प्रमाणात माहिती असते. त्यामुळे ती सगळी माहिती साठवणं आणि त्यावर प्रक्रिया करणं यासाठी विशेष लक्ष द्यावं लागतं. डेटाबेस डेव्हलपर (Database Developers Demand) याच गोष्टींमध्ये निपुण असतात. मोठ्या प्रमाणात माहिती तयार करणं, साठवणं, त्यावर प्रक्रिया करणं, ट्रबलशूट करणं आणि माहितीचं नियोजन करणं या गोष्टी डेटाबेस डेव्हलपर करत असतो. त्यामुळेच या पदावर काम करणाऱ्यांची मागणी वाढली आहे. डेटाबेस डेव्हलपर्सना पगार किती मिळतो? डेटाबेस डेव्हलपर्सची गरज जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये भासते; मात्र त्यांचा पगार हा कंपनीचे बजेट, त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या आणि त्यांची क्षमता या गोष्टींवर ठरतो. ग्लासडोअरने (Glassdoor) दिलेल्या माहितीनुसार, भारतातल्या डेटाबेस डेव्हलपरचा पगार (Annual Salary of Database Developer) वर्षाला सुमारे सहा लाख रुपये एवढा आहे. अधिकचा भत्ता, बोनस, कमिशन, टिप आणि प्रॉफिट शेअरिंग अशा गोष्टी गृहीत धरून हा आकडा समोर आला आहे. डेटाबेस डेव्हलपर आणखी नव्या गोष्टी आत्मसात करून, डेटाबेस इंजिनीअर (Database Engineer) किंवा अ‍ॅनालिस्ट (Database Analyst) म्हणूनही काम करू शकतो. ‘बिग डेटा’संबंधी (Big Data) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार हे साधारण डेटाबेस डेव्हलपर्सपेक्षा किती तरी पटींनी अधिक असतात. सध्या जग मोठ्या प्रमाणात डिजिटल होत चाललं आहे. त्यामुळे डेटाबेस डेव्हलपर्सची गरज (Demand of Database Developers) येत्या काळात वाढतच जाणार आहे. डीबी डेव्हलपर होण्याचा मार्ग सोपा नसला, तरी ऑनलाइन टूल्स किंवा इतर कित्येक लर्निंग प्लॅटफॉर्म्सच्या मदतीने कोणीही हे कौशल्य आत्मसात करू शकतं. ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सने (BLS) दिलेल्या एका अहवालानुसार, डेटाबेस डेव्हलपर्स आणि संबंधित क्षेत्रांमधल्या नोकरीच्या संधी या 2020 ते 2030 या दशकात 8 ते 10 टक्क्यांनी वाढू शकतात. त्यामुळे टेक-सॅव्ही असणाऱ्यांनी आतापासूनच या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणं फायद्याचं ठरणार आहे. ही माहिती आपल्यापर्यंत पियुष राज यांनी आणली आहे. डिजीटल उत्पादने, BFSI, रिटेल आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 14+ वर्षांचा उद्योग अनुभव असलेले अनुभवी एंटरप्राइझ-सेल्स व्यावसायिक उद्योजक आहेत. त्यांनी Bridgentech.com ची सह-स्थापना केली आणि त्याच्या बूटस्ट्रॅप्ड स्टार्ट-अपसह $2.5M+ च्या उत्कृष्ट ARR सह एक मजबूत टीम तयार केली आहे. ते MIT, मणिपाल (मेकॅनिकल इंजिनीअरिंग), SPJIMR, मुंबई (MBA), ESB Reutlingen, जर्मनी आणि TU म्युनिक, जर्मनी यांसारख्या भारतातील प्रमुख संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी जगभर प्रवास केला आहे, प्रामुख्याने पश्चिम युरोप, यूएस आणि भारतीय उपखंडातील बाजारपेठांमध्ये काम केले आहे. तसंच त्यांनी व्यवसाय वाढ आणि यशाच्या दिशेने संघ तयार केले, व्यवस्थापित केले आणि त्यांचे नेतृत्व केले आणि गुंतवणुकीच्या नवीन कल्पना आणि व्यवसाय योजनांमध्ये नेहमीच रस असतो. त्याच्या छंदांमध्ये UI/UX डिझाइन, व्यवसाय नियोजन, संगीत, प्रशिक्षण आणि धोरण यांचा समावेश आहे.
First published:

Tags: Career, Career opportunities, Technology

पुढील बातम्या