मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Gmail वरून इंटरनेट नसतानाही पाठवता येईल ई-मेल, जाणून घ्या सोपी ट्रिक

Gmail वरून इंटरनेट नसतानाही पाठवता येईल ई-मेल, जाणून घ्या सोपी ट्रिक

 इंटरनेट (Internet) ही आता आपली गरज बनली आहे. सध्याच्या काळात बहुतांश कामं इंटरनेटच्या मदतीनं अगदी सहज आणि जलदपणे होतात. एखाद्या गोष्टीचा तपशील फोटोसह सहज पाठवू शकतो. ई-मेलमुळे (Email) हे काम अगदी सोपं झालं आहे. ई-मेलसाठी जी-मेलचा (Gmail) सर्वाधिक वापर होतो.

पुढे वाचा ...
मुंबई, 29 जून : इंटरनेट (Internet) ही आता आपली गरज बनली आहे. सध्याच्या काळात बहुतांश कामं इंटरनेटच्या मदतीनं अगदी सहज आणि जलदपणे होतात. पूर्वीच्या काळी एखादा निरोप, मेसेज अथवा महत्त्वाचा तपशील दुसऱ्या गावातल्या नातेवाईकांना किंवा अन्य व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर पत्र किंवा तार हे मर्यादित पर्याय उपलब्ध होते. या प्रक्रियेला बराच अवधी लागत असे. परंतु, प्रगत तंत्रज्ञानामुळे आता आपण दूरवरच्या किंवा परदेशात असलेल्या व्यक्तीला अगदी काही क्षणात मेसेज करू शकतो. एखाद्या गोष्टीचा तपशील फोटोसह सहज पाठवू शकतो. ई-मेलमुळे (Email) हे काम अगदी सोपं झालं आहे. ई-मेलसाठी जी-मेलचा (Gmail) सर्वाधिक वापर होतो. जी-मेलचा वापर करण्यासाठी इंटरनेट आवश्यक असतं, हे आपल्याला माहिती आहे. परंतु, आता इंटरनेटविनादेखील जी-मेलचा वापर करता येतो. यासाठी एक खास ट्रिक वापरली जाते. विशेष म्हणजे या ट्रिकमुळे जी-मेलवर आलेले ई-मेल्स तुम्ही वाचूदेखील शकता. मेल सर्च करू शकता आणि इतकंच काय, तर मेलला उत्तरही सेंड करू शकता. गेल्या काही वर्षांत जगभरात जी-मेल युझर्सची संख्या कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. महत्त्वाचा तपशील, मेसेज पाठवण्यासाठी, तसंच कार्यालयीन कामकाजासाठी प्रामुख्याने जी-मेलचा वापर केला जातो. इंटरनेटच्या माध्यमातून वापरता येणारी जी-मेल सुविधा आता विनाइंटरनेटदेखील वापरता येणार आहे. विनाइंटरनेट जीमेल वापरण्यासाठी एक खास ट्रिकचा वापर केला जातो. विशेष म्हणजे विना इंटरनेट तुम्ही मेल वाचूदेखील शकता. गुगल सपोर्टच्या माहितीनुसार, ऑफलाइन मेलची लिंक तुम्ही बुकमार्क (Bookmark) करू शकता. तुम्ही तुमच्या ऑफिसचा किंवा कॉलेजचा लॅपटॉप वापरत असाल, तर तिथल्या अ‍ॅडमिनला सांगून सेटिंग्ज बदलून घेऊ शकता आणि विनाइंटरनेट मेल वाचू शकता. जी-मेलवर आलेले मेल्स विनाइंटरनेट वाचण्यासाठी, सर्च करण्यासाठी किंवा मेलला उत्तर देण्यासाठी एक ट्रिक वापरता येते. यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर Chrome डाउनलोड करावं. विनाइंटरनेट जी-मेल अ‍ॅक्सेस (Access) करण्याची सुविधा ही फक्त Chrome Browser Window वर वापरता येते. ही विंडो Incognito Mode वर काम करत नाही. त्यानंतर तुम्हाला क्रोम ब्राउझरच्या (Chrome Browser) जी-मेल ऑफलाइन सेटिंग्जमध्ये जावं लागेल. या सेटिंग्जमध्ये गेल्यावर एक नवी विंडो ओपन होईल. या विंडोवर तुम्हाला Enable Offline Mail हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावं. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सेटिंग्जमध्ये हवे तसे बदल करू शकता. विनाइंटरनेट जी-मेल पाहण्यासाठी तुम्ही किती दिवसांपूर्वीचे मेल Sync करू इच्छिता, हेदेखील तुम्ही ठरवू शकता. सेटिंग्जमध्ये बदल केल्यानंतर तुम्हाला Save Changes या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. या सर्व सेटिंग्ज केल्यावर तुम्ही विनाइंटरनेट मेल वाचू शकता किंवा मेलला उत्तर देऊ शकता.
First published:

पुढील बातम्या